अनैतिक संबंधातून खून

murder
murder

बुलडाणा : पावसाचा जोर सुरू असताना पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरू होता. अशातच 5 नोव्हेंबरला लोणार पोलिस स्टेशनच्या हद्दीत मातमळ गावानजीक एका अनोळखी व्यक्तीचा गळा कापलेल्या अवस्थेत मृत्यदेह पुलाखाली अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. 

ओळख न पटल्याने पोलिसांनी चार दिवस वाट पाहून त्याच्यावर अंतिम संस्कार केले. कुठलाही सुगावा नसताना तब्बल 12 दिवसांनंतर स्थानिक गुन्हे विभागाने प्रकरण तडीस नेऊन त्या व्यक्तीचा खून झाला असून, हा खून अनैतिक संबंधात आडकाठी ठरत असल्याने झाल्याचे तपासात समोर आले आहे. लोणार पोलिस निरीक्षक राजेंद्र माळी यांनी सोशल मीडियावर ओळख पटविण्याचे आवाहन केले.

पथकांव्दारे शोध सुरू
या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी व मृत व्यक्तीचा शोध घेण्याचे आवाहन स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा यांच्यासमोर उभे होते. त्यानुसार कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे पथक तयार करण्यात येऊन लगतच्या जिल्ह्यात शोध घेत मानवी कौशल्याने ठिकठिकाणी मृतकाची ओळख पटविण्याचे काम करण्यात आले. 

गोळ्यावरून लागला सुगावा
मृतकाच्या खिशात सापडलेल्या शासकीय गोळ्याव्दारे माहिती काढण्याचे प्रयत्न केले असता त्या गोळ्या शासकीय असल्यामुळे मालेगाव ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर तांत्रिक माध्यमातून तपास करण्यात येऊन ओळख पटविण्याचे काम करण्यात आले. मृत व्यक्ती हा आकाश दिलीप तायडे (वय 28 रा. अमानी ता. मालेगाव जि. वाशीम) असल्याचे समोर आले. 

प्रियकरामार्फत केला खून
पथकाने अमानी गावाला जात तेथे सखोल चौकशी केली असता मृतकाचा भाऊ राजू दिलीप तायडे यांच्यासह नातेवाइकाने फोटोवरुन मृतकाला ओळखले. त्यानंतर खुनाचा तपासाची चक्रे फिरविली असता ग्राम अमानी, मालेगाव शहर व डही येथील नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर आकाश तायडे याच्या पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी सातवे रत्न दाखविताच तिने तिच्या नवऱ्याचा तिच्या प्रियकरामार्फत खून केल्याचे कबूल केले. 

असा घडला घटनाक्रम
अमानी गावातील सतीश पांडुरंग नालटे यांच्यासोबत अनैतिक संबंध आल्याचे सांगत आमच्या संबंधांविषयी पतीला माहिती असल्यामुळे तो दररोज दारू पिऊन मारहाण करायचा व अनैतिक संबंधात अडसर ठरत होता. त्यामुळे प्रियकरासोबत त्याचा मित्र दीपक रमेश आरू (रा.अमानी) तिघांनी पतीला दुखण्याच्या बहाण्याने शासकीय दवाखाना मालेगाव येथे दाखल केले होते. 4 नोव्हेंबरला सायंकाळी 7 वाजता डिस्चार्ज करून घेतला. त्यानंतर पती आकाश तायडे याला प्रियकर सतीश नालटे व मित्र दीपक आरू यांनी ग्राम अमानी जाण्याच्या बहाण्याने सतीश नालटे याच्या ऑटोमधून बसवून अमानी जाण्याचा बहाण्याने मालेगाव बायपासकडे घेऊन गेले. तेथे आकाश याच्या डोक्यावर व गळ्यावर वार करून जीवे मारले.

दोघांना बेड्या
आकाशचे प्रेत पोत्यात भरून ऑटोमध्ये टाकून लोणार हद्दीत फेकून देण्यासाठी सतीश नालटे व दीपक आरू घेऊन गेले. त्यांनी मालेगाव येथे सोडून दिल्याचेही मृत आकाश तायडे याच्या पत्नीने सांगितले आहे. या प्रकरणातील आकाश तायडे याची 26 वर्षीय पत्नी व दीपक रमेश आरू (वय 28) या दोघांना एलसीबीने ताब्यात घेऊन त्यांना लोणार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कौशल्य लावले पणाला
कोणताही सुगावा किंवा पुरावा नसताना केवळ गोळ्याच्या पाकीट आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, एडीएसपी संदीप पखाले, एलसीबी पीआय महेंद्र देशमुख, लोणार पीआय राजेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनात विजय मोरे, पांडुरंग इंगळे, प्रदीप आढाव, मुकूंद देशमुख, सुधाकर काळे, दीपक पवार, लक्ष्मण कटक, विजय दराडे, रघुनाथ जाधव, सुनील खरात, विजय सोनोने, गणेश शेळके, अमोल अंभोरे, सरिता वोकोडे, अनुराधा उबरहंडे, राहुल बोरडे, विजय मुंढे, रवी भिसे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com