esakal | क्षुल्लक वादातून खून; मद्यप्राशनानंतर केला काठीने प्रहार
sakal

बोलून बातमी शोधा

क्षुल्लक वादातून खून; मद्यप्राशनानंतर केला काठीने प्रहार

क्षुल्लक वादातून खून; मद्यप्राशनानंतर केला काठीने प्रहार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : तालुक्‍यातील सावळा गावात दारूच्या नशेत क्षुल्लक कारणावरून ४२ वर्षीय व्यक्तीचा खून (Murder) झाला. पोलिसांनी काही तासांतच हल्लेखोरास अटक (The attacker were arrested) केली. रामभाऊ ऊर्फ लखन काकडे (वय ४२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. (Murder in a trivial dispute in Amravati)

रामभाऊ व संशयित स्वप्नील मून (वय ३२) या दोघांनी सोबत मद्य प्राशन केल्यानंतर क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर स्वप्नीलने काठीने प्रहार केला. त्यात रामभाऊचा जागीच मृत्यू झाला. पोलिस पाटील कवीश मेटे यांनी दत्तापूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी संशयित आरोपी स्वप्नील मूनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: कोरोना काळात तत्काळ पैसे हवेत? जाणून घ्या, बचत खात्यातून कसे काढायचे पैसे

दत्तापूरचे सहायक निरीक्षक शिवशंकर खेडेकर यांच्या पथकाने सालनापूर येथील शेतातून हल्लेखोरास अटक केली. उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जाधव, पोलिस निरीक्षक ब्रह्मदेव शेळके, सहायक पोलिस निरीक्षक शिवशंकर खेडेकर आदींनी घटनास्थळी भेट दिली.

चार महिन्यांपूर्वीच ग्रामस्थांची तक्रार

सावळा येथे अवैध दारूविक्री सुरू आहे. यासंदर्भात ग्रामपंचायततर्फे चार महिन्यांपूर्वी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. तक्रारीची दखल न घेतल्यामुळे हा अनुचित प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. वेळीच सदर तक्रारीवर कारवाई झाली असती तर रामभाऊचा जीव वाचला असता, असे ग्रामस्थांनी सांगितले.

हेही वाचा: विदर्भात १५ जूनपर्यंत मॉन्सून धडकणार? हवामान विभागातर्फे संकेत

मद्य विक्रीला अभय कुणाचे?

मोठ्या प्रमाणात अवैध मद्यविक्री सुरू असताना पोलिस व राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काहींनी केला. अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. हा प्रकार माहिती असतानाही याकडे पोलिस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभाग दुर्लक्ष करीत आहे.

(Murder in a trivial dispute in Amravati)