काठीने प्रहार करून बापलेकाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

विजयगोपाल (जि. वर्धा) - पुलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या इंझाळा येथे गुंडप्रवृत्तीच्या व्यक्‍तीने बापलेकाची काठीने प्रहार करून हत्या केली. गुरुवारी (ता. ९) पहाटे ही घटना घडली. बापलेकाची हत्या केल्याने गावात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले. नत्थूजी तुकाराम होले (वय ७०) व संजय नत्थूजी होले (वय ४८, रा. इंझाळा), अशी मृत बापलेकांची नावे आहेत. महादेव बापूराव बरडे (वय ६०), असे आरोपीचे नाव आहे.

शेतकरी संजय होले पहाटे पाचला गोठ्यात शेण काढत होते. महादेव बरडे तिथे गेला. त्याने संजयच्या डोक्‍यावर काठीने प्रहार करून त्याची हत्या केली. वडील नत्थूजी होले मुलाला बघण्यासाठी गोठ्याकडे जात असताना आरोपी बरडे याची रस्त्यातच भेट झाली. आरोपीने त्यांच्याही डोक्‍यावर काठीने प्रहार केला. रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. 
मृत संजय यांचे कुटुंब यवतमाळ येथे वास्तुपूजनाच्या कार्यक्रमाला गेले होते. तेसुद्धा गुरुवारी कार्यक्रमाला जाणार होते. हा प्रकार घडत असताना संजय यांचा मुलगा सागर (वय १३) झोपेत होता. यामुळे त्याचा जीव वाचला. होले कुटुंबीयांचा गावात कुणाशीही वाद नव्हता. संजय हा शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. 

तंटामुक्‍तीचे अध्यक्ष पंकज गादगे यांनी घटनेची माहिती पुलगाव पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक मुरलीधर बुराडे यांनी आरोपी बरडेला अटक केली. उसनवारीच्या पैशाच्या कारणातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीविरुद्ध अनेक गुन्हे

आरोपी बरडे हा गुंडप्रवृत्तीचा असून त्याच्यावर पुलगाव ठाण्यात अनेक गुन्हे नोंद आहेत. ग्रामस्थांना विनाकारण शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, रात्री दुसऱ्याच्या शेतातील पिकात बकऱ्या सोडणे हे त्याचे नित्याचेच प्रकार होते.

Web Title: murder in injhala