प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

गोंदिया - प्रेमसंबंधातील कुरबुरी विकोपाला गेल्याने प्रियकराने प्रेयसीची देशी कट्ट्यातून गोळ्या घालून हत्या केली. यानंतर त्यानेही आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना रावणवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवाटोला गावाजवळ बुधवारी (ता. 19) सकाळी उघडकीस आली.

गोंदिया - प्रेमसंबंधातील कुरबुरी विकोपाला गेल्याने प्रियकराने प्रेयसीची देशी कट्ट्यातून गोळ्या घालून हत्या केली. यानंतर त्यानेही आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना रावणवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवाटोला गावाजवळ बुधवारी (ता. 19) सकाळी उघडकीस आली.

आकाश भास्कर वैद्य (वय 32, रा. गोंदिया) व काजल मेश्राम (वय 28, छोटा गोंदिया) अशी मृतांची नावे आहेत. आकाशने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून, तो बेरोजगार होता, तर काजल अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला होती. नवाटोलानजीकच्या घिवारी शेतशिवारात गावकऱ्यांना दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळले. घटनास्थळावर सापडलेल्या दुचाकीमुळे या दोघांची ओळख पटली, तर आकाश वैद्य याच्या खिशात पोलिसांना आढळून आलेल्या मृत्युपूर्व पत्रामुळे या घटनेमागील कारण स्पष्ट झाले.

आकाश व काजल हे दोघेही एमएच 35-व्ही 612 क्रमांकाच्या दुचाकीने मंगळवारी (ता. 18) परिसरात फिरताना दिसले होते. रात्रीच्या सुमारास दोघांत झालेला वाद विकोपाला गेल्याने आकाशने काजलवर देशी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या. यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तेथून काही अंतरावर जाऊन आकाशनेही डोक्‍यात बंदुकीच्या गोळ्या घालून स्वतःलाही संपविले.

सुसाइड नोटने उलगडले रहस्य
प्रेमसंबंधात सुरू असलेल्या कुरबुरीमुळे आकाशने हे पाऊल उचलल्याचे त्याच्या खिशात सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये आढळले. चिठ्ठीतील मजकुरानुसार, आकाशने त्याची आई व कुटुंबातील अन्य सदस्यांना उद्देशून काजलच्या वागणुकीमुळे आपले आयुष्य खराब झाले असल्याचे स्पष्ट करत त्यामुळेच हे पाऊल उचलल्याचे लिहिले आहे.

Web Title: murder by lover

टॅग्स