पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून एकाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

कुरखेडा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असलेल्या खोब्रामेंढा येथील 55 वर्षीय व्यक्तीची नक्षलवाद्यांनी धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना आज सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरची- कुरखेडा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असलेल्या खोब्रामेंढा येथील 55 वर्षीय व्यक्तीची नक्षलवाद्यांनी धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना आज सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अंताराम पांडुजी पुडो रा. खोब्रामेंढा असे हत्या झालेल्या ईसमाचे नाव असून तो एका तेंदूपत्ता कंत्राटदाराकडे फळी मॅनेजर म्हणून काम करीत होता काल रात्रीच्या दहा वाजताचे सुमारास 50 ते 60च्या संख्येत असलेल्या नक्षलवाद्यांनी त्याला त्याच्या घरून गावाबाहेर दिड कि.मी. अंतरावर खोब्रामेंढा देवस्थान टी-पॉईंटवर नेऊन त्याची धारदार शस्त्राने गळा कापून हत्या करण्यात आली आली.

हत्या केल्यानंतर घटनास्थळावर नक्षलवाद्यांनी टाकलेल्या पत्रकात अंताराम पुडो हा पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या नमूद करण्यात आले आहे आहे पुढील तपास मालेवाडा पोलिस करीत आहे.

Web Title: Murder In Mob lynching