जेवणानंतर पाण्यात बुडवून मानवीला संपविले; खुनाचे कारण गुलदस्त्यात

crime
crimecrime

आर्णी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील कुऱ्हा डुमनी येथील मानवी चोले खून (Murder) प्रकरणाने अवघ्या राज्याला हादरवून सोडले आहे. २० डिसेंबरला खेळता-खेळता मानवी ही लहानग्या चुलत भावासह चुलत काकूच्या घरी गेली. तिने काकूला जेवण मागितले. साखर पोळीचे जेवण दिल्यावर काकूने मानवीला घरातील पाण्याच्या प्लास्टिक टाकीत बुडवून मारले, ही बाब बुधवारी (ता. २९) कुऱ्हा डुमनी येथे करण्यात आलेल्या प्रात्यक्षिक पंचनाम्यादरम्यान समोर आली. मात्र, मानवीचा खून नेमक्या कोणत्या कारणासाठी केला, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. (motive for the murder is unclear)

२० डिसेंबर रोजी मानवी ही आरोपी महिला दीपाली उर्फ पुष्पा चोले हिच्या मुलासह खेळत होती. मुलासोबत घरी आल्यावर जेवण दिल्यानंतर तिने चिमुकलीचा खून केला. आपल्यावर संशय येऊ नये म्हणून मृतदेह स्वयंपाक खोलीतील एका स्टीलच्या टाकीत झाकून ठेवला. बेपत्ता झाल्यापासून घटनेच्या सातव्या दिवशी रविवारी (ता. २६) रात्री घराशेजारी राहणारा भाचा सूरज कातोरे याला दुर्गंध आला. त्यामुळे त्यानी घरी येऊन दीपालीकडे दुर्गंधाबाबत विचारणा केली. मला माहिती नाही, असे उत्तर देत दरवाजा लावून घेतला.

crime
5 new year resolution for couples : अशा पद्धतीने ‘रोमान्स’ केल्यास नात्यात येईल गोडवा

काही वेळातच भांडे पडण्याचा आवाज येऊन मोठ्या प्रमाणात दुर्गंध सुटला. क्षणाचाही विलंब न करता सूरज व राकेश हे दोघे दुर्गंधाच्या दिशेने गेले असता, शौचालयाजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ मानवीचा मृतदेह आढळून आला. सूरजने आरडाओरड करीत मृतदेह घरामागे असल्याचे सांगितले. स्टिलच्या टाकीतील मृतदेह बाहेर काढल्यावर टाकीला दुर्गंधी येऊ नये म्हणून टाकी पुसून कापड कपाटामागे फेकून दिले.

संपूर्ण घटनाक्रमाचा प्रात्यक्षिक पंचनामा दीपाली हिने पोलिसांपुढे करून दाखविला. पोलिसांनी महिला आरोपीच्या घरातील पाण्याची टाकी जप्त केली. शासकीय पंचासह दोन तास पंचनामा करण्यात आला. यावेळी ठाणेदार पितांबर जाधव, जमादार दिनेश जाधव, मनोज चव्हाण, संतोष गावंडे, माधुरी चव्हाण, सचिन पिसे उपस्थित होते. आरोपीला गावात आणताच बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

crime
३१ डिसेंबरच्या पार्ट्यांवर नागपुरात बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

स्वत:च्या मुलाविषयी माया

मानवीच्या खून प्रकरणात प्रात्यक्षिक पंचनामा करण्यासाठी दीपाली चोले हिला दुपारी कुऱ्हा डुमनी येथे आणण्यात आले. तिला मोठा चार वर्षीय मुलगा व एक वर्षाची मुलगी आहे. प्रात्यक्षिक करून पोलिस वाहनात जातेवेळी एक वर्षीय मुलगी उपाशी असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने मुलीला पोलिस वाहनातच दूध पाजले. उपाशी असलेल्या मुलीला बघून दीपालीची ममता जागृत झाली. मात्र, मानवीच्या वेळेस अशीच माया दाखविली असती, तर चिमुकलीचा जीव गेला नसता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com