पैशाच्या वादातून मित्राचा खून 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

नागपूर - उधार दिलेल्या पैशाच्या वादातून एकाने दगडाने ठेचून मित्राचाच खून केला. ही थरारक घटना शुक्रवारी मध्यरात्री हुडकेश्‍वर सुदामनगरी परिसरात घडली. विशाल ऊर्फ प्रदीप दिलीप मानकर (21, रा. तुळजाईनगर, सुदामनगरी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. रोहित ऊर्फ छोटू हरीश शाहू (23, रा. सुदामनगरी) असे आरोपीचे नाव आहे. 

नागपूर - उधार दिलेल्या पैशाच्या वादातून एकाने दगडाने ठेचून मित्राचाच खून केला. ही थरारक घटना शुक्रवारी मध्यरात्री हुडकेश्‍वर सुदामनगरी परिसरात घडली. विशाल ऊर्फ प्रदीप दिलीप मानकर (21, रा. तुळजाईनगर, सुदामनगरी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. रोहित ऊर्फ छोटू हरीश शाहू (23, रा. सुदामनगरी) असे आरोपीचे नाव आहे. 

विशाल हा कॅटरिंगचे काम करतो, तर आरोपी हा हातमजुरीचे काम करतो. गेल्या दोन वर्षांपासून विशालने वेळोवेळी छोटूकडून पैसे उधार घेतले होते. ही सर्व उधारी एकूण 40 हजार रुपये असल्याचा आरोपीचा दावा होता व तो विशालकडे पैसे परत करण्याचा तगादा लावत होता. छोटूकडून पैशासाठी होणाऱ्या मागणीला कंटाळून विशालने त्याचा काटा काढण्याचे ठरवले होते. शुक्रवारी संध्याकाळी छोटूने पुन्हा पैशाची मागणी केली असता विशालने त्याला रात्री दारू पिण्याकरिता बोलवले. त्यानुसार, 10 वाजताच्या सुमारास दोघेही सुदामनगरी परिसरातील एका नाल्याजवळ दारू पिली. पैशावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. विशालने छोटूला कानशिलात लगावली. त्यानंतर छोटूने मोठा दगड विशालच्या डोक्‍यात घातला. तो रक्तबंबाळ अवस्थेत कोसळून बेशुद्ध पडला. त्याला जीवानीशी संपविण्यासाठी त्याने त्याचे डोके पुन्हा ठेचून काढले. हुडकेश्‍वर पोलिसांनी छोटूविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

अशी पटली ओळख 
अनोळखी युवकाचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाइकाचा शोध घेतला. परिसरात नागरिकांना मृताचा फोटो दाखवला. मृतदेहाच्या पॅंटच्या खिशात एका कॅटरिंगचे कार्ड सापडले. त्यावरून त्याची ओळख पटली. त्या कॅटरिंगमध्ये विशालचा भाऊही कामाला आहे. 

असा लागला छडा 
हत्याकांड मध्यरात्री घडल्याने कुणीही साक्षीदार नव्हते. शस्त्राचा वापर नव्हता किंवा लूटमारही झाली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी विशालच्या काही मित्रांची धरपकड केली. सायंकाळी छोटूसोबत विशालला पाहिल्याचे काहींनी सांगितले. छोटू उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याला खाक्‍या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. 

Web Title: murder in nagpur

टॅग्स