शांतीनगरात तरुणाचा खून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

नागपूर - शहरात सशस्त्र खुनी हल्ले सुरूच असून काल रात्री अकराच्या सुमारास जुन्या वादातून एका तरुणाचा खून झाला. शांतीनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कावळापेठ परिसरात या घटनेने नागरिकांत दहशत निर्माण झाली. 

निखिल मेश्राम (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. निखिल मेश्राम रात्री घराबाहेर असताना चार ते पाच आरोपींना तलवार, सब्बल आदींनी त्याच्यावर प्रहार केले. यातच त्याचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपी पसार झाले. काही नागरिकांनी घटनेची माहिती शांतीनगर पोलिस स्टेशनला दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. जुन्या वादातून खून झाल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. 

Web Title: murder in nagpur

टॅग्स