नागपूरमध्ये आणखी एका तरूणीचा गळा चिरून खून 

अनिल कांबळे
मंगळवार, 12 जून 2018

गिट्टीखदानमधील जगदीशनगरात अज्ञात आरोपींनी 25 वर्षीय तरूणीचा गळा चिरून खून केला. ही घटना आज मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली.

नागपूर - गिट्टीखदानमधील जगदीशनगरात अज्ञात आरोपींनी 25 वर्षीय तरूणीचा गळा चिरून खून केला. ही घटना आज मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली.

बनम शहजाद खान (गिट्टीखदान) असे खून झालेल्या तरूणीचे नाव आहे. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. गेल्या चोवीस तासांतील उपराजधानीतील हा सहावा खून आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास आराधनानगरात पवनकर कुटूंबातील पाच जणांचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती.

Web Title: murder in nagpur

टॅग्स