पत्नी व मुलाचा खून करून शेतात पुरले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

नागपूर : खात (ता. मौदा) येथे घटस्फोटीत पत्नी व मुलाचा खून करून शेतात पुरल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी अरोली पोलिसांनी आरोपी पती अनिरुद्ध बावणे (वय 45, रा. खात) यास अटक केली आहे. पत्नी लता (वय 40) व मुलगा धीरज (वय 18) अशी मृताची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 19 वर्षांपूर्वी अनिरुद्ध व लताचा प्रेमविवाह झाला होता. काही वर्षातच दोघांमध्ये घटस्फोट झाला. लताला पोटगी मिळत होती. ती मुलगा धीरजसह आई-वडिलांकडे काटोल येथे राहत होती. घटस्फोटानंतर दोघांमध्ये संपत्तीवरून कोर्टात वाद सुरू होता. 27 नोव्हेंबरपासून लता व धीरज बेपत्ता होते.

नागपूर : खात (ता. मौदा) येथे घटस्फोटीत पत्नी व मुलाचा खून करून शेतात पुरल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी अरोली पोलिसांनी आरोपी पती अनिरुद्ध बावणे (वय 45, रा. खात) यास अटक केली आहे. पत्नी लता (वय 40) व मुलगा धीरज (वय 18) अशी मृताची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 19 वर्षांपूर्वी अनिरुद्ध व लताचा प्रेमविवाह झाला होता. काही वर्षातच दोघांमध्ये घटस्फोट झाला. लताला पोटगी मिळत होती. ती मुलगा धीरजसह आई-वडिलांकडे काटोल येथे राहत होती. घटस्फोटानंतर दोघांमध्ये संपत्तीवरून कोर्टात वाद सुरू होता. 27 नोव्हेंबरपासून लता व धीरज बेपत्ता होते. मंगळवारी अरोली पोलिसांनी अनिरुद्धच्या घोटमुद्री येथील शेतातील पुरलेल्या ठिकाणातून लता व धीरजचे बाहेर काढण्यात आले. पुढील तपास अरोली पोलिस करीत आहेत.

Web Title: murder at nagpur