esakal | पोलिसांची कमाल! चोविस तासात लावला खुनाचा छडा
sakal

बोलून बातमी शोधा

khuni

आरोपीचा पोळ्याला गावातील एका व्यक्तीशी वाद झाला परंतु त्या व्यक्तीने याविषयी पोलिसात तक्रार केली नाही. त्यामुळे मृत महिलेने त्या व्यक्तीला तू पोलिसात तक्रार का केली नाही, मी साक्ष दिली असती असे सांगितले.

पोलिसांची कमाल! चोविस तासात लावला खुनाचा छडा

sakal_logo
By
अतुल दंढारे

मेंढला (नरखेड) (जि. नागपूर) : नरखेड तालुक्यातील जलालखेडा पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या मौजा खराशी सालई रिठी शिवारात ४९ वर्षीय व्यक्तीने एका महिलेचा खून केला आहे. जलालखेडा पोलिसांनी २४ तासाच्या आत या खुनाचा शोध लावून आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार आरोपी नागोराव महादेव राऊत ४९ रा. परसोडी ( दुकाने) ता. कारंजा जि. वर्धा याचे येथील विवाहित महिला सारिका नागोराव भुसारी ३५ रा. परसोडी( दुकाने) या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे कळते. आरोपीचा पोळ्याला गावातील एका व्यक्तीशी वाद झाला परंतु त्या व्यक्तीने याविषयी पोलिसात तक्रार केली नाही. त्यामुळे मृत महिलेने त्या व्यक्तीला तू पोलिसात तक्रार का केली नाही, मी साक्ष दिली असती असे सांगितले.

ही बाब आरोपीला माहिती झाली, याच गोष्टीच्या रागावरून आरोपीने महिलेला तिच्या शेतात जाऊन तिच्यावर कुऱ्हाडीने वार केले महिला जखमी झाल्यामुळे तिला कारंजा येथे दवाखान्यात नेण्यात आले तिथून तिला आर्वी येथे हलवण्यात आले. दरम्यान घाव खूप असल्यामुळे गुरुवारी (२७ ऑगस्ट) तिचा मृत्यू झाला. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या खुनाविषयी कोणीही काही सांगायला तयार नव्हते परंतु जलालखेडा पोलिसांनी कसून चौकशी करीत या खुनाचा शोध २४ तासात लावला व आरोपी नागोराव महादेव राऊत ४९ रा. परसोडी (दुकाने) जी. वर्धा याला अटक करून त्या विरूद्ध भा. द. वी. कलम ३०२,२०१ नुसार गुन्हा नोंद केला आहे.

सविस्तर वाचा - अधिक माहितीसाठी - पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी नाराज! काय आहे नेमका बदल्यांचा ‘पेच’

ही कार्यवाही ठाणेदार दीपक डेकाटे, उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे, पोलिस कर्मचारी प्रज्योग तायडे, राजेश कोल्हे,संजय माळकोटे,समाधान बिथरे कुणाल अरगुडे यांनी केली असून पुढील तपास जलालखेडा पोलिस करीत आहेत.

संपादन - स्वाती हुद्दार