हॅलो, कंट्रोल रूम? शाळेच्या मागे एक मृतदेह पडून आहे...

murder
murder

अल्लीपूर (वर्धा) : येथे एका व्यक्‍तीची दगडाने ठेचून हत्या झाल्याची घटना घडली. हमीद पठाण (वय 30) असे मृताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. 25) पहाटेच्या सुमारास घडली. ही हत्या अनैतिक संबंधातून घडल्याची चर्चा आहे. यातील मारेकऱ्याचा सुगावा पोलिसांना लागला असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
 
येथील यशवंत शाळेच्या मागील भागात एका व्यक्‍तीचा रक्‍ताने माखलेला मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पहाटेच्या सुमारासच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिस निरीक्षक योगेश कामाले, सहायक पोलिस निरीक्षक गणेश बैरागी, जमादार संजय रिठे, संजय वानखेडे, पिंटू पिसे यांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली असता दगडाने ठेचून हत्या झाल्याचे पुढे आले.

दगडाने ठेचून संपविले
पोलिसांनी तत्काळ हत्या झालेला परिसर सील करून घेतला. मृताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. त्याचे नाव हमीद पठाण असल्याचे पुढे आले. हमीद पठाण हा गत काही दिवसांपूर्वी व्यवसायासाठी समुद्रपूर येथे गेल्याचे पुढे आले. असे असले तरी अल्लीपूर येथे त्याचे जाणे येणे होते. काल देखील तो अल्लीपूर येथील आपल्या भावाच्या घरी आलेला होता. त्याचे गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची गावात चर्चा आहे. हा खून देखील अनैतिक संबंधातूनच झाला असल्याचे गावातील लोक बोलत आहेत. 

लॉकडाउनच्या काळात हत्या 
लॉकडाउन सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षेकरिता पोलिस विभाग कार्यरत आहे. या काळात वर्ध्यात दारूचे गुन्हे घडत होते. इतर गुन्ह्यांना ब्रेक होता. अल्लीपुरात खून झाल्याने हा ब्रेक सुटल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com