रेगुंठा येथे जमिनीच्या वादातून महिलेचा खून; दोघे गंभीर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

रेगुंठा येथे रविवारी (ता.3) राजक्का बोल्ले या महिलेसोबत 2 महिला शेतामध्ये काम करण्यासाठी गेल्या होत्या. काम करीत असताना समय्या दुर्गम नामक आरोपीने या तीन महिलांवर अचानक कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात राजक्का वेंकय्या बोल्ले ही महिला जागीच ठार झाली तर उर्वरित 2 महिला गंभीर जखमी झाल्या.

सिरोंचा (जि. गडचिरोली) : शेतीच्या वादातून एका महिलेचा कुऱ्हाडीने खून करण्यात आला; तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना रविवारी (ता.3) सिरोंचा येथून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या रेंगुठा उपपोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या रेगुंठा या गावी दुपारच्या सुमारास घडली. राजक्का व्यंकटी बोल्ले (वय 40) असे मृत महिलेचे नाव आहे. 

सविस्तर माहिती अशी की, रेगुंठा येथे रविवारी (ता.3) राजक्का बोल्ले या महिलेसोबत 2 महिला शेतामध्ये काम करण्यासाठी गेल्या होत्या. काम करीत असताना समय्या दुर्गम नामक आरोपीने या तीन महिलांवर अचानक कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात राजक्का वेंकय्या बोल्ले ही महिला जागीच ठार झाली तर उर्वरित 2 महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

मृत राजक्का बोल्ले आणि समय्या दुर्गम यांच्यामध्ये काही वर्षांपासून जमिनीचा वाद सुरू होता. या वादातूनच समय्या दुर्गम याने कुऱ्हाडीने राजक्का बोल्ले हिचा खून केला, अशी माहिती मिळाली आहे. घटनेचा तपास उपपोलीस स्टेशन रेगुंठाचे पोलीस करीत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a woman in a land dispute at Reguntha; Two women serious