प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून; संशयिताला अटक

प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून; संशयिताला अटक

दिग्रस (जि. यवतमाळ) : मुलीसोबत सुरू असलेल्या प्रेम प्रकरणाच्या कारणावरून तरुणाच्या डोक्यावर वार करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी (ता.18) सकाळी सातला तालुक्यातील मेंढी येथील शेतशिवारात उघडकीस आली आहे. कृष्णा परशराम उकंउे (वय 22, रा. डोळंबावाडी) असे मृताचे नाव आहे.

मेंढी येथील रस्त्याच्या बाजूला पडिक शेतात तरुणाचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत दिसल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती मेंढी येथील पोलिस पाटील यांनी दिग्रस पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा सुरू केला. तेव्हा सदर तरुण डोळंबावाडी येथील रहिवासी कृष्णा उकंडे असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

कृष्णा हा मुंबई येथे काम करण्यासाठी गेला होता. रक्षाबंधनानिमित्त दोन दिवसांपूर्वीच आपल्या गावी आलेला कृष्णा शनिवारी (ता.17) मेंढी येथील मामा गुलाब मारोती बुचके यांच्याकडे गेला होता. मृतकाचे संशयित संतोष दौलत डहाके (रा. मेंढी) याच्या मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू असल्याची बाब समोर आली. या प्रेम प्रकरणाची संशयिताला माहिती झाली होती. त्याने यापूर्वी कृष्णाला धमकी दिल्याची बाब गुलाब बुचके यांनी पोलिसांत दिली. त्यावरून पोलिसांनी संशयित संतोष डहाके याला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.

या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी गुलाब बुचके यांच्या तक्रारीवरून संतोष डहाके याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी उदयसिंह चंदेल, पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले, सहायक पोलिस निरीक्षक विनायक जाधव, पोलिस उपनिरीक्षक सुरेश कनाके, नितीन वास्टर, अरविंद कोकाटे, प्रकाश चव्हाण, ब्रम्हदेव टाले, मनोज चव्हाण करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com