दिव्यांग तरुणीची छेड काढल्याने तरुणाचा खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

आर्णी (जि. यवतमाळ) : दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या मुलीची छेड काढल्याने चौघांनी तरुणाला मारहाण करून खून केला. ही घटना तालुक्‍यातील खेड बीड येथे गुरुवारी (ता. 12) दुपारी साडेपाचला घडली.

आर्णी (जि. यवतमाळ) : दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या मुलीची छेड काढल्याने चौघांनी तरुणाला मारहाण करून खून केला. ही घटना तालुक्‍यातील खेड बीड येथे गुरुवारी (ता. 12) दुपारी साडेपाचला घडली.
शंकर मानसिंग जाधव (वय 32, रा. खेडबीड), असे मृताचे नाव आहे. तरुणी दिव्यांग असल्याचा फायदा घेत शंकरने छेड काढली. त्यामुळे चौघांनी लाथाबुक्‍क्‍या, दगडांनी मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार मृताची पत्नी कांता शंकर जाधव (वय 30) हिने आर्णी पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून बेबीचंद राठोड (वय 22), मुलचंद राठोड (वय 25), वसंत राठोड (वय 40), भावराव राठोड (वय 35, सर्व रा. खेड बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी तिघांना तत्काळ अटक केली असून, भावराव राठोड हा फरार आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी उदयसिंग चंदेल यांनी घटनास्थळी भेट दिली. शुक्रवारी (ता. 13) शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला.
तक्रारीतून उलगडले रहस्य
खेड येथे खून झाल्याच्या घटनेने तालुक्‍यात खळबळ उडाली. खून कोणत्या कारणाने झाला यांची कुठलीच माहिती नागरिकांना नसल्याने विविध चर्चांना उधाण आले. अखेर मृताच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर या घटनेचे रहस्य उलगडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The murder of a young man