क्षुल्लक कारणावरून युवकाचा निर्घृण खून 

क्षुल्लक कारणावरून युवकाचा निर्घृण खून 

नागपूर : एका कुख्यात आरोपीने साथिदारांसह क्षुल्लक कारणावरून एका युवकाचा बीयरची बॉटल डोक्‍यात घालून तसेच पोटात चाकू भोसकून निर्घृण खून केला. हा थरार आज रविवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास हुडकेश्‍वरमध्ये घडला. पलाश विजय दिवटे (वय 24, निळकंठ नगर, हुडकेश्‍वर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. अभय राऊत असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली. 

अभय राऊत हा कुख्यात गुंड असून त्याने नंदनवनमधील जगनाडे चौकात असलेल्या संग्राम बारमध्ये एका युवकाचा खून केला होता. तेव्हापासून त्याची गुन्हेगारी जगतात ख्याती आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पलाश दिवटे मित्रांसह दुर्गा देवी विसर्जन रॅलीमध्ये गेला होता. पहाटे तीन वाजताच्या सुमारात तो घराकडे परत जात होता. दरम्यान तो सिगरेट घेण्यासाठी उमरेड रोड, दिघोरीतील क्‍वॉलीटी चिकन सेंटर व पान सेंटरवर थांबला. तेथे मुख्य आरोपी अभय राऊत, चेतन राऊत, सागर बोडारे, जेकब आणि ठाकरे यांच्यासह अन्य दोन युवक तेथे थांबले होते. अभय आणि पलाश यांच्यात शाब्दीक चकमक झाली.

दोघांनीही एकमेकांना शिवीगाळ केली. त्यामुळे अभय आणि त्याच्या साथिदारांनी पलाशला मारहाण केली. त्याच्या डोक्‍यात बीयरची बाटली फोडली त्यानंतर चाकूने भोसकले. रक्‍ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर आरोपींनी पळ काढला. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्‍वर पोलिस घटनास्थळावर पोहचले. त्यांनी पलाशला मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. पलाशचे वडील विजय कृष्णाजी दिवटे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. हुडकेश्‍वर पोलिसांनी तीन तासात मुख्य आरोपीसह चौघांना अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com