प्रेयसीने दिला लग्नास नकार; प्रियकराचा पाचजणांवर चाकूहल्ला

Murderer Attack
Murderer Attack

नागपूर - तीन वर्षे प्रेमसंबंध ठेवल्यानंतर प्रेयसीने अचानक लग्नास नकार दिल्याचे दुःख न पचवू शकलेल्या प्रियकराने रागाच्या भरात रस्त्यात जे दिसले त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये पाचजण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास पाचपावलीत उघडकीस आली. रितिक ऊर्फ सोमेश विलास पराते (वय १९, रा. पाचपावली) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली.

सोमेश हा बेरोजगार असून तो दारुडा आहे. तो दोन वर्षांपूर्वी गणेशपेठमधील प्रेरणा कॉलेजमध्ये शिकत असताना त्याच्याच वर्गात अंजली (बदललेले नाव) हिच्याशी ओळख झाली होती. दोघांचे मैत्रीनंतर प्रेम प्रकरण फुलले. दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. दोघांचे प्रेमसंबंध दोन वर्षांपर्यंत सुरू होते.

बारावी झाल्यानंतर दोघांनीही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले. तर अंजलीची आर्थिक स्थिती योग्य नसल्यामुळे तिने एका कूलर कंपनीत नोकरी स्वीकारली. तर सोमेश हा बेरोजगार म्हणून फिरत आहे. त्याला दारूचे व्यसन जडले. त्यातच त्याने अंजलीला लग्नाची गळ घातली. त्यामुळे अवघ्या १९ व्या वयात बेरोजगार असलेला सोमेशला भविष्याचा विचार करून तिने नकार दिला. गेल्या काही महिन्यांपासून ती त्याला टाळत होती.

परंतु, सोमेश तिचा पाठलाग करून तिला लग्नासाठी तगादा लावत होता. सोमवारी रात्री नऊ वाजता त्याने अंजलीला लग्नाबाबत विचारले असता तिने पुन्हा नकार दिला. प्रेमास नकार पचवता न आल्याने त्याने चिडून खिशातील चाकू काढून रस्त्याने दिसेल त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये राजू गोविंदराव नंदनवार (तांडापेठ, जुनी वस्ती), जितेंद्र गुलाबराव मोहाडीकर (४२), रमेश श्रावण निखारे (५०), प्रतीश सुरेंद्र खापरे (वय १५) आणि मोहम्मद शेख अन्सारी मोहम्मद खाजम मरहूम (वय ३५) यांच्यावर चाकूहल्ला केला. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाचपावली पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून अटक केली.

यापूर्वीही गुन्हे दाखल
आरोपी सोमेश पराते हा शस्त्र बाळगण्याच्या सवयीचा आहे. त्यावर दोन महिन्यांपूर्वीच शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. वस्तीत गुंडगिरी करणे आणि दहशत माजविणे यासाठी त्याची पाचपावलीत ओळख आहे. त्याने आतापर्यंत अनेकांना मारहाण, धमकी, खंडणी आणि वसुली केली आहे. मात्र, त्याच्या भीतीपोटी कुणीही तक्रार देण्यास धजावत नाही. 

गणेशपेठमध्ये तक्रारी
अंजलीने त्याला नकार दिल्यानंतर तो तिचा पाठलाग करीत होता. फोनवरून तसेच वारंवार भेटून तिला मानसिक व शारीरिक त्रास देत होता. त्याच्या रोजच्या त्रासाला कंटाळून अंजलीने गणेशपेठ पोलिस ठाण्यात दोनदा तक्रारी दिल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com