लक्ष्मीनगरात युवतीला भोसकले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

लक्ष्मीनगर - प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या प्रियकराने प्रेयसीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. ही थरारक घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास शहरातील सर्वांत शांत समजल्या जाणाऱ्या लक्ष्मीनगर, आठ रस्ता चौकाजवळ घडली. या घटनेमुळे  परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोहित हेमनानी ( वय २२, रा. खामला, सिंधी कॉलनी) असे आरोपीचे नाव असून, तो फरार आहे. युवतीवर ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितची खामल्यात मोबाईल शॉपी आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्याचे मोनिका (वय १८, बदललेले नाव, रा. लक्ष्मीनगर) हिच्याशी प्रेमसंबंध आहेत. मोनिका टेक्‍स्टाइल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकते. मोनिका आणि रोहित यांच्या प्रेमात काही दिवसांपूर्वी एका युवकाची ‘एंट्री’ झाली. तेव्हापासून मोनिका रोहितला टाळत होती.  महिन्याभरापूर्वी दोघांचा या युवकावरून वाद झाला. कडाक्‍याचे भांडण झाल्यानंतर त्यांचे ‘ब्रेक अप’ झाले. दुरावा निर्माण झाल्यामुळे रोहितचा फोन ती उचलत नव्हती. त्यामुळे तो चिडला होता.

ठरवून आला होता
शेवटचे भेटायचे आहे, अशी गळ घातल्यामुळे मोनिकाने त्याला कार्यालयात बोलावले होते. रोहितने मोठा चाकू पाठीमागे खोचून ठेवला होता. त्याने मोनिकाला कार्यालयाच्या बाहेर  बोलावले. मात्र, तिने आत येण्यास सांगितले. आत गेल्यानंतर लगेच मोनिकाच्या पोटावर, पाठीवर आणि मांडीवर चाकूचे सपासप वार केले.

मोनिकाने सांगितले होते फोटो डिलीट करण्यास
मोनिकाला रोहितसोबतचे सर्व संबंध तोडायचे होते. त्यामुळे तिने त्याला मोबाईलमधील फोटो डिलीट करण्यास सांगितले होते. मात्र, रोहित फोटो डिलीट न करता तिला ब्लॅकमेल करीत होता, अशी चर्चा आहे. 

घटनेनंतर रोहित फरार झाला असून त्याच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मोनिका एका फायनान्स कंपनीत नोकरी करते. रोहितने भेटण्याचा तगादा लावल्यामुळे तिने  रविवारी सायंकाळी त्याला ऑफिससमोर बोलावले होते. कार्यालयातच रोहितने मोनिकावर चाकूने हल्ला केला. बजाजनगर पोलिसांनी चाकू जप्त केला असून रोहितवर गुन्हा दाखल केला आहे.

लक्ष्मीनगरातील शांत परिसर हादरला
सर्वांत शांत परिसर म्हणून लक्ष्मीनगरची ओळख आहे. साधी चोरी किंवा घरफोडीची घटना या परिसरात होत नाही. त्यामुळे चाकूहल्ला प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेचीच परिसरात चर्चा होती.

Web Title: murderer attack on girl crime