पोलिस उपनिरीक्षकावर प्राणघातक हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

कोंढाळी - येथील पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक पवन भांबुरकर व शिपाई पन्नालाल बटाऊवाले हे दोघे वर्धा जिल्ह्यात जाणाऱ्या चोरट्या विदेशी दारूच्या माहितीसाठी बुधवारी (ता.16) रात्री साडेनऊला सायखोड भागात गेले. तेथील काही जणांनी त्यांच्यावर लाठीकाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात उपनिरीक्षक भांबुरकर हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणात कोंढाळी पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी गफ्फार शेख भुरू (वय 50) याने दारू तपासणीच्या नावाखाली भांबुरकर व बटाऊवाले यांनी घरी येऊन पत्नीला धक्काबुक्की केल्याची तक्रार नोंदविली.
Web Title: murderer attack on police inspector crime