सोशल मीडियावरून नगराध्यक्षांची बदनामी;पोस्ट व्हायरल 

file Photo
file Photo

टेकाडी (जि.नागपूर) ः सोशल मीडियावर कन्हान नगर परिषदेचे नगराध्यक्ष शंकर चहांदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह व बदनामीकारक पोस्ट टाकल्याने अज्ञात आरोपीवर कन्हान पोलिसांत अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फेसबुकवर आक्षेपार्ह टाकण्यात आलेली पोस्ट काही तासातच "डिलीट' करण्यात आली असून पुरावे म्हणून पोस्टच्या स्क्रिन शॉटवरून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे ही पोस्ट टेकाडी, कांद्री जिल्हा परिषद सर्कल नावाच्या फेसबुक ग्रुपवर असून त्यावर भारतीय जनता पक्षाचे चिन्ह "डीपी' म्हणून वापरण्यात आलेले आहे. नगराध्यक्ष शंकर चहांदे यांना बदनामीचा अहेर घरूनच मिळाल्याची चर्चा जोरात सुरू आहे. 

कन्हान नगर परिषदेचे अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे रामटेक विधानसभाप्रमुख आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे माजी सदस्य शंकर चहांदे यांच्यावर काहींचा पक्षांतर्गत कलह असल्याचे दाखले त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातील व्यक्‍त झालेल्या विरोधातून पुन्हा एकदा पुढे आले. अवघ्या काही दिवसांवर जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. अशात जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या पत्नीची उमेदवारी भाजपमधून असल्याची चर्चा जोमात आहे. यातच फेसबुकवर टेकाडी, कांद्री जिल्हा परिषद सर्कल नावाचा ग्रुप बनविण्यात आला. त्यावर भारतीय जनता पक्षाचे चिन्ह लागले असल्याने भारतीय जनता पक्षाच्या समसर्थकांनीच तो बनविला असल्याचा काहींचा अंदाज आहे. 

बुधवारी चहांदेविरोधात आक्षेपार्ह पोस्ट या ग्रुपवर येऊन धडकली. त्यात आक्षेपार्ह मजकूर लिहून महिला पोलिसांच्या हाती लागलेल्या आरोपीच्या फोटोवर शंकर चहांदे यांचा फोटो लावून व्हायरल करण्यात आला आहे. यामुळे चहांदे समर्थक आणि दणका संघटनेचे अध्यक्ष योगेश वाडीभस्मे यांनी संताप व्यक्त करीत यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची पोलिसांत विनंती केली व कन्हान पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली आहे. कन्हान पोलिसांनी अज्ञात व्यक्‍तीविरोधात अदखल पात्र गुन्ह्याची नोंदणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com