किल्ल्यावर घुमू लागले नृत्य-संगीताचे सूर!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

मुख्यमंत्र्यांचे डिजिटल भाषण!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सलग दुसऱ्या वर्षी कालिदास समारोहाच्या उद्‌घाटन सोहळ्याला अनुपस्थित राहिले. कन्हान-नगरधन मार्गावरील सर्व छोट्या गावांमध्ये मुख्यमंत्री येणार म्हणून उत्सुकता होती. पण, मुख्यमंत्री येणार नाही म्हणून स्पष्ट झाले आणि अनेकांची निराशा झाली. मात्र, व्हिडिओ सीडीद्वारे मुख्यमंत्र्यांनी समारोहाला शुभेच्छा दिल्या. "कालिदास महोत्सव कलाप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरेल. यापुढे त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करू,' असे मुख्यमंत्री म्हणाले.

नागपूर ः साडेसोळाशे वर्षांपूर्वीचे वाकाटकांचे साम्राज्य असो वा चारशे वर्षांपूर्वीचे गोंडाचे राज्य असो नगरधनच्या किल्ल्याने त्याही काळात सांस्कृतिक वैभव अनुभवले आहे. काळ लोटला आणि वाकाटकांची राजधानी एका छोट्याशा गावामध्ये रूपांतरित झाली. मात्र, आज कित्येक वर्षांनंतर कालिदास समारोहाच्या निमित्ताने किल्ल्यात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या शास्त्रीय नृत्य व संगीताचे सूर घुमू लागले. या अनुभवाने किल्ल्याचा परकोटही शेकडो वर्षांनंतर सुखावला असेल.

कुठल्याही भाषणांची औपचारिकता न बाळगता थेट दीपप्रज्वलनाने समारोहाला प्रारंभ झाला. ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, आमदार अनिल सोले, माजी आमदार आशीष जयस्वाल, सुप्रसिद्ध युवा लेखक अमिष त्रिपाठी, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. किल्ल्याची रंगरंगोटी झाली होती. आतील भागात करण्यात आलेल्या रोषणाईने किल्ला उजळून निघाला होता. अशात पं. भवानी शंकर-उमा शंकर यांची पखवाज व गायनाची जुगलबंदी अनोखी मेजवानी ठरली. जवळपास एक तास रंगलेल्या या जुगलबंदीनंतर यामिनी व भावना रेड्डी यांचे कुचीपुडी नृत्य व रात्री उशिरा पद्मश्री भारती बंधूंचे सुफी गायनाने महोत्सवाची रंगत वाढवली.

मुख्यमंत्र्यांचे डिजिटल भाषण!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सलग दुसऱ्या वर्षी कालिदास समारोहाच्या उद्‌घाटन सोहळ्याला अनुपस्थित राहिले. कन्हान-नगरधन मार्गावरील सर्व छोट्या गावांमध्ये मुख्यमंत्री येणार म्हणून उत्सुकता होती. पण, मुख्यमंत्री येणार नाही म्हणून स्पष्ट झाले आणि अनेकांची निराशा झाली. मात्र, व्हिडिओ सीडीद्वारे मुख्यमंत्र्यांनी समारोहाला शुभेच्छा दिल्या. "कालिदास महोत्सव कलाप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरेल. यापुढे त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करू,' असे मुख्यमंत्री म्हणाले.
.......
महोत्सवात आज
* राहुल शर्मा यांचे संतूरवादन
* कलापिनी कोमकली यांचे शास्त्रीय गायन
* वेळ ः सायंकाळी 6 वाजता
* स्थळ ः स्व. वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाइन्स

Web Title: nagardhan fort's glory