नागपूर गोठले, विदर्भ गारठला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

अमरावती : उत्तर भारतात होत असलेली बर्फवृष्टी आणि उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे मध्य प्रदेश पाठोपाठ विदर्भ गारठला आहे. नागपूरचे शनिवारचे किमान तापमान 3.5 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. या किमान तापमानाने महाबळेश्‍वर या थंड हवेच्या ठिकाणांसह नाशिक, मालेगावलासुद्धा मागे टाकले.

मराठवाड्यात सर्वांत कमी औरंगाबादचे किमान तापमान 5.8 तर मध्य महाराष्ट्रात नाशिक, मालेगाव व पुण्याचे किमान तापमान अनुक्रमे 5.1, 5.4 व 5.9 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मुंबई-कोकण क्षेत्रात किमान तापमान 13.0 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. पश्‍चिम मध्य प्रदेशात बैतुल व पचमढीचे तापमान 1 अंश सेल्सिअस; तर पूर्व मध्य प्रदेशात खजुराहो 1.4, उमरिया 1.7 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
5 जानेवारीपर्यंत लाट
उत्तर भारतात तीव्र ते अतितीव्र थंडीची लाट आहे. आगामी दोन दिवस ही लाट कायम राहील. 1 जानेवारीला हिमालयात पश्‍चिमी चक्रवात सक्रिय होण्याची व वाऱ्याची दिशा बदलण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर चक्राकार वारे वाहत असल्याने मध्य महाराष्ट्रात थंडीची तीव्रता कमी आहे. विदर्भात 5 जानेवारीपर्यंत थंडीची लाट कायम राहील, असे श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामानशास्त्र विभागप्रमुख प्रा. अनिल बंड यांनी सांगितले.
जिल्हानिहाय तापमान (अंश सेल्सिअस)
नागपूर 3.5, अकोला 5.9, गोंदिया 6.0, ब्रह्मपुरी 7.0, बुलडाणा 7.8, वर्धा 8.4, वाशीम 8.6, यवतमाळ, चंद्रपूर 9.0, अमरावती 9.6 आणि गडचिरोली 10.2

Web Title: Nagpur @ 3.5