उन्हाले भ्यालो तं पोट कसं भरीन! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

नागपूर - वेळ साधारण दुपारी दीडची. पारा 42 डिग्रीवर. दोन्ही पायांनी अपंग असलेला चाळिशीतील युवक पोटात दोन घास टाकण्यासाठी एका मंदिरासमोर येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांसमोर हात पसरवित होता. कुणी आठ आणे, तर कुणी एक रुपया. किंवा खूपच दयाळू असेल तर पाच किंवा दहाची नोट हातावर ठेवायचा. जमा झालेले पैसे मोजत बाजूच्याच टपरीवर दोन सामोसे पोटात टाकल्यानंतर पुन्हा ताजातवाना होत पुन्हा तो भाविकांसमोर हात पसरतोय. 

राजू रंभाजीसारखे उन्हातान्हात धार्मिक स्थळांवर भिक्षा मागून पोट भरणारे भिक्षेकरी शहरात जागोजागी पाहायला मिळतात. पोलिओग्रस्त राजू आपल्या तीनचाकीवर बसून साईमंदिर परिसरात भाविकांसमोर हात पसरवून उदरनिर्वाह करतो. एवढ्या उन्हात भीक मागण्याबद्दल विचारले असता राजू म्हणाला, मी गेल्या 20-25 वर्षांपासून हे काम करतो आहे. दोन्ही पाय लुळे पडल्याने काम करू शकत नाही. त्यामुळे भीक मागण्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नाही. उन्हाले भ्यालो तं पोट कसं भरीन? त्याच्या बोलण्यात त्याचं दु:ख आणि गरिबीच्या वेदनाही होत्या. मूळ चंद्रपूर जिल्ह्यातील 45 वर्षीय राजूला मायबाप कुणीही नाही. एका राजकीय नेत्याच्या वाढदिवसानिमित्त मिळालेल्या तीनचाकी रिक्षावर बसून दिवसभर भीक मागणे आणि मिळेल तिथे अंग टाकणे, हा त्याचा नित्यक्रम. जमा झालेल्या पाच-पन्नास रुपयांत दोनवेळचं खाणं आणि आयुष्याचे दिवस पुढे ढकलणे. 

Web Title: Nagpur @ 42