विदर्भ गारठला, नागपूर 9.6 अंश सेल्सिअस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

अमरावती : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले पेथाई वादळ शमल्यानंतर बदललेली वाऱ्याची दिशा पूर्ववत होऊन वातावरणात कमालीचा गारठा वाढला. विदर्भात नागपूर जिल्ह्यात आज, बुधवारी किमान तापमानाची सर्वांत कमी 9.6 अंश सेल्सिअस नोंद झाली.

उत्तर भारतात बर्फवृष्टी होत असून उत्तरेकडून थंड वारे दक्षिणेकडे वाहू लागले आहेत. परिणामी विदर्भात थंडीची लाट येण्यास सुरुवात झाली. भारतीय हवामान विभागाच्या आज, बुधवारी तापमानाच्या जिल्हानिहाय नोंदी नागपूर 9.6, यवतमाळ 10.2, बुलडाणा, चंद्रपूर, ब्रह्मपुरी 10.4, वर्धा 10.5, अमरावती 10.6, गोंदिया 11.0, गडचिरोली 12.0 आणि अकोला 12.1 अशा घेण्यात आल्या आहेत. विदर्भाचे कमाल तापमान 23.4 ते 28.3 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दिवस आणि रात्रीच्या तापमानात चोवीस तासांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 3.6 अंश सेल्सिअसचा बदल झाला.

Web Title: Nagpur 9.6 degree Celsius