पुढील दोन आठवड्यांत एअर इंडियाच्या 24 फेऱ्या रद्द

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : एअर इंडियाने 6 ते 20 डिसेंबर या कालावधीत मुंबई आणि दिल्ली येथे जाणारे आणि तिथून येणाऱ्या 24 विमानांच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाचा सर्वाधिक फटका नागपुरात 16 डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावणाऱ्यांना होणार आहे. नववर्ष जवळ असल्याने सामान्य प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागणार आहे. 

या काळात काही विमान सात दिवसांऐवजी काही दिवसच चालविण्यात येणार आहे. दिल्ली येथून रायपूरमार्गे नागपुरात येणारे विमान या काळात आठवड्यातून चारच दिवस रायपुरातूनच दिल्लीकडे रवाना होणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार एअर इंडियाचे दिल्ली-नागपूर विमान क्रमांक 641 सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी येणार आहे. दिल्ली-नागपूर 469 मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारी सकाळी 5 वाजून 25 मिनिटांनी रवाना होऊन 7.10 वाजता येणार आहे. सोमवार, गुरुवार आणि शनिवारला दिल्लीवरून सकाळी 5.15 मिनिटांनी उड्डाण घेऊन 8.10 मिनिटांनी नागपुरात पोहोचणार आहे. मुंबई-नागपूर 629 विमान 12 जानेवारीपर्यंत सायंकाळी सातला मुंबईतून उडणार असून 8.35 मिनिटांनी नागपुरात पोहोचेल. नागपुरातील दिल्लीसाठी एअर इंडियाचे विमान 624 मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारी रात्री दोनला रवाना होईल.

सोमवार, गुरुवार आणि शनिवारी हे विमान रद्द करण्यात आलेले आहे. नागपूर-रायपूर-दिल्ली विमान सकाळी सकाळी 7.40 मिनिटांनी मंगळवार, बुधवार, शुक्रवारी आणि रविवारी रवाना होणार आहे. सोमवार, गुरुवार आणि शनिवारी हे विमान सकाळी 8.55 मिनिटांनी थेट दिल्लीला रवाना होणार आहे. 

कार्यालयाशी संपर्क साधावा
नागपूर-मुंबई एअर इंडिया 630 विमान सोमवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी उडेल. एअर इंडियाचे स्टेशन व्यवस्थापक वसंत बरडे यांनी सांगितले की, नवीन वेळापत्रकानुसार 20 डिसेंबरपर्यंत काही बदल करण्यात आलेले आहेत. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी एअर इंडिया कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com