नागपूर विमानतळाचे ‘टेक ऑफ’

Nagpur-Airport-Revenue
Nagpur-Airport-Revenue

नागपूर - मिहान प्रकल्पामुळे आंतरराष्ट्रीयस्तरावर उल्लेख होत असलेल्या नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. वर्षभरात प्रवाशांच्या संख्येत तीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून, व्यवसायात तब्बल २१० टक्के वाढ झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या चकरा आणि त्यांना भेटायला येणाऱ्यांमुळे यात भर पडली आहे. 

मिहान इंडिया लिमिटेडने माहिती अधिकारी कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहिती दिली. त्यात एक जानेवारी ते डिसेंबर २०१८ या काळात २६ लाख ७२ हजार २० प्रवाशांनी ये-जा केली असल्याचे सांगितले. गेल्यावर्षी याच कालावधीत २० लाख ६१ हजार ३४९ प्रवाशांनी ये-जा केली होती.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १२० टक्के महसुलात वाढ झाली. गतवर्षी ५५ कोटी १२ लाख १६ हजार ६५७ रुपये महसूल विमानतळाला मिळाला होता. यंदा  तो १२० कोटी ४ लाख ११ हजार ५६९ रुपयांवर गेला. गतवर्षी मिळालेल्या महसुलापेक्षा ३९ लाख रुपयांचे अधिक खर्च विमानतळ व्यवस्थापनासह इतर बाबीवर झाला होता. यंदा ९३ कोटी ७० लाख २४ हजार ३१३ रुपयांचा खर्च झाला. खर्चाच्या तुलनेत उत्पादन अधिक झाले असून, २६ कोटी ३३ लाख ८७ हजार २५६ रुपयांचा नफा मिहान इंडिया लिमिटेडला झाला. गेल्यावर्षी १३०६ खासगी विमाने, हेलिकॉप्टर येथे आली. यंदा १२४२ विमाने उतरली असली तरी गतवर्षीच्या तुलनेत लॅडिंग महसुलात वाढ होऊन तो २५ कोटी ९ लाख २२  हजारांवर गेला. विमान पार्किंग शुल्कातही ११० टक्के वाढ झाली.  

वर्षभरात इंडियन रोड काँग्रेसचे अधिवेशन, डॉक्‍टरांच्या परिषदा, ॲग्रोव्हिजन, पावसाळी अधिवेशन, भाजपची अनुसूचित जाती जमातीची राष्ट्रीय परिषदेसह विविध कार्यक्रम शहरात झाले. त्यामुळे शहरात पाहुण्यांची मांदियाळी होती. याशिवाय मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरात कायम भेट देतात. त्याचाही फायदा मिहान इंडिया लिमिटेडला झाला असल्याचे पुढे आलेल्या आकडेवारीवरून दिसून येते. २०१८ मध्ये तीन विमानांचे इमर्जन्सी लॅंडिग झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com