या सुंदर कलाकृती कशाच्या आहेत, महिती आहे का?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 डिसेंबर 2019

टाकाऊतून टिकाऊ अथवा कचऱ्यातून कलानिर्मिती या गोष्टी आता अंगवळणी पडत असल्या तरी घर अथवा कार्यालयातील तुटक्‍या खुर्च्या, मोडलेले दरवाजे, जुने कुलर, पंखे, निरुपयोगी भांडे, मडके अशा अंसख्य गोष्टी दुर्लक्षित पडलेल्या असतात.

नागपूर : दिवाळी किंवा एखाद्या समारंभासाठी स्वच्छता आरंभली की घरातील भंगार विक्रीसाठी बाहेर पडतो. भंगाराला आपण घरात कुठेही स्थान देत नाही. लवकरात लवकर त्याची विक्री करण्याचा प्रयत्न करीत असतो. चार पैसे मिळतील आणि ते कामात येतील, याचाच आपण विचार करीत असतो. भंगार विकून नवीन वस्तू विकत घेण्याची अनेकांची तयारी असते. मात्र, भंगाराचाही सुंदर कलाकृतीसाठी उपयोग होऊ शकतो, हे अनेकांना माहित नाही. 

Image may contain: people sitting, shoes, outdoor and nature

टाकाऊतून टिकाऊ अथवा कचऱ्यातून कलानिर्मिती या गोष्टी आता अंगवळणी पडत असल्या तरी घर अथवा कार्यालयातील तुटक्‍या खुर्च्या, मोडलेले दरवाजे, जुने कुलर, पंखे, निरुपयोगी भांडे, मडके अशा अंसख्य गोष्टी दुर्लक्षित पडलेल्या असतात. ऊन, पाऊस, वारा या सगळ्यांचा मारा सहन केलेल्या व गंजलेल्या वस्तूंपासून सुंदर कलाकृतींच्या निर्मितीचे काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ललीत कला भवनात साकारले आहे. 

Image may contain: one or more people and people sitting

सविस्तर वाचा - सोयाबीनला सोन्याचे दिवस, भाव 4 हजार 200 वर

नागपूर विद्यापीठाच्या विविध विभागामध्येही अशाचप्रकारे भंगार पडलेले आहे. जुन्या आलमारी, कुलर, पंखे, खुर्च्या, रॅक आणि "ई-वेस्ट' (संगणकाचे साहित्य) सुद्धा. विभागांची जागा व्यापून असलेला हा कचरा फेकायचा किंवा विकायचा, असा विचार विद्यापीठात सुरू होता. तेव्हा ललित कला विभाग प्रमुख डॉ. मुक्तादेवी मोहिते यांनी हा कचरा आम्हाला द्या, अशी मागणी केली. प्रस्ताव ऐकूण सर्वांना आश्‍चर्यही वाटले. परंतु, मागणीनुसार विविध विभागाचे हे भंगार एक दिवस अमरावती रोड-अंबाझरी या मार्गावरील ललित कला विभागाच्या जागेवर हलविण्यात आले. लोकांना गंज चढून खराब दिसणारा, नकोसा वाटणाऱ्या या कचऱ्यातून विभागातील कलात्मक मेंदूद्वारे नवीन कलानिर्मितीचे काम सुरू झाले. 

Image may contain: tree and outdoor

अधिक माहितीसाठी - पत्नीने केला दुसरा घरोबा.... रागाच्या भरात पतीने उचलले हे पाऊल​

विभागातील प्राध्यापक, चित्रकार व कलेचे विविध विषय शिकणारे विद्यार्थी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन भंगारावर तुटून पडले. त्यांच्या कल्पनेतील कलाकृतीसाठी आवश्‍यक त्या साहित्याची जुळवाजुळव सुरू झाली. कचऱ्यातून "स्क्रॅप आर्ट' वर्कशॉपमध्ये डॉ. सदानंद चौधरी, प्रा. दीपक सोरटे, प्रा. महेश मानकर, मिलिंद लींमबेकर, प्रा. मनोज चोपडे, प्रा. मौतिक काटे यांनी विद्यार्थ्यांच्या सहाय्याने अप्रतिम कलाकृतीची निर्मिती केली आहे. 

Image may contain: people sitting, shoes, tree and outdoor

नागरिकांना पाहण्यासाठी खुले

कलाकृती विद्यापीठ परिसरातील ललीत कला विभाग गुरुनाथ भवन परिसरात नागरिकांना सकाळी दहा ते सायंकाळी पाच यावेळेत पाहण्यासाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. यात भंगाराच्या साहित्यापासून बनविलेला घोडा, ऐरोप्लेन, मच्छर, कोंबडा, पवनचक्की, मुखवटे, होम थेटर, शोभेच्या वस्तू, सायकल, पुस्तकांचे रॅक, स्कुटर, हातपंप, रोबो, टेबल, खुर्च्या इत्यादी अत्यंत आकर्षक आणि सृजनशील कलाकृतींची निर्मिती पाहायला मिळणार आहे. 

अवश्य वाचा - निराधार व अंध असूनही मिळविले हे यश... वाचा ही प्रेरणादायी कहाणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur : Beautiful artwork made from waste