Loksabha 2019 : साठ वेळा होईल ईव्हीएम चाचणी !

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रविवारी सुनावणी घेत ईव्हीएम चाचणीचे आदेश दिले.

लोकसभा 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीची तातडीची बाब लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रविवारी सुनावणी घेत ईव्हीएम चाचणीचे आदेश दिले. साठवेळा आलटून पालटून ईव्हीएम चाचणी करावी, असे आदेश न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

रविवारी सुनावणी होण्याचा हा दुर्मीळ प्रसंग मानला जात आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. शनिवारी देखील तातडीचे म्हणून यावर सुनावणी घेण्यात आली होती. आज झालेल्या सुनावणीत निवडणूक आयोगाचे वकील आणि सरकारी वकीलांच्या ऐवजी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी व्यवस्थेची बाजू मांडली.

Web Title: The Nagpur Bench of the Bombay High Court ordered the trial of EVMs