बलात्कारप्रकरणी शिक्षा कायम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

नागपूर - दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला गोंदिया जिल्हा न्यायालयाने दिलेली दहा वर्षे कारावासाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. आरोपीचे नाव शिवम ऊर्फ स्वप्नील विश्‍वनाथ शेंडे (वय 19, रा. आमगाव) असे आहे. 

घटना 10 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 2 वाजतादरम्यान घडली. घटनेच्या दिवशी पीडित मुलीची आई घरगुती कामात व्यस्त होती. या संधीचा गैरफायदा घेत मुलीला मोबाईलवर गाणी ऐकविण्याच्या कारणाने आरोपी तिला घराच्या आत घेऊन गेला. तिथे त्याने मुलीवर बलात्कार केला आणि पळून गेला. अचानक झालेल्या प्रकारामुळे भयभीत झालेल्या मुलीने तत्काळ संपूर्ण प्रकार आईला सांगितला. या वेळी पीडितेच्या गुप्तांगातून रक्‍त निघत असल्याचे दिसून आले. पीडितेच्या आईने आमगाव पोलिस ठाण्याला तक्रार नोंदविली. वैद्यकीय अहवालातदेखील मुलीवर बलात्कार झाल्याचे दिसून आले. गोंदिया जिल्हा न्यायालयाने आरोपीला 4 मे 2016 रोजी दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती. त्याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले. मात्र, प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेत न्यायालयाने आरोपीची शिक्षा कायम ठेवली. सरकारतर्फे सरकारी वकील राजेश नायक यांनी बाजू मांडली. 

Web Title: Nagpur bench of the Bombay High Court upheld the ten years of imprisonment