कारवाईनंतरही "दादा'गिरी कायम 

रविवार, 10 जून 2018

नागपूर - शहर वाहतूक पोलिसांनी गेल्या दोन वर्षांत 8 हजार 800 फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. मात्र तरीही शहरात मोठ्या प्रमाणात "बाबा', "भाऊ', "दादा' या नावासदृश्‍य नंबर प्लेटचा वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

नागपूर - शहर वाहतूक पोलिसांनी गेल्या दोन वर्षांत 8 हजार 800 फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. मात्र तरीही शहरात मोठ्या प्रमाणात "बाबा', "भाऊ', "दादा' या नावासदृश्‍य नंबर प्लेटचा वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

शहरातील चौका-चौकात सीसीटीव्हीचा वॉच असल्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र, ब्लॅक फिल्म, ट्रीपल सिट आणि फॅन्सी नंबर प्लेट वापरणारे वाहतूक पोलिसांच्या टार्गेटवर आहे. महाविद्यालयीन युवक आणि राजकीय वरदहस्त असलेले छुटपूट कार्यकर्ते फॅन्सी नंबर प्लेटचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. यासोबत राजकीय पक्षाचे झेंडे, देवाचे फोटो, फुले, चंद्र, तारे किंवा अभिनेत्यांच्या नावासदृश्‍य वाहन क्रमांक नंबर प्लेटवर लावून शहरभर फिरणाऱ्यांवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. ही बाब लक्षात घेत पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम आणि उपायुक्‍त चैतन्य एस. यांनी वाहतुकीचे काटेकोरपणे नियमन व्हावे, या उद्देशाने आक्रमक पवित्रा घेत फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. 

राजकीय छुटपूट नेते 
काही राजकीय पक्षाचे छुटपूट तथाकथित कार्यकर्ते राजकीय पक्षाचे चिन्ह, नगरसेवक ते पंतप्रधानापर्यंतचे फोटो, देवी-देवतांचे फोटो, राजकीय पक्षांचे झेंडे नंबर प्लेटवर काढतात. काहीजण चित्र-विचित्र रंगसंगती ठेवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना आढळून येत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. 

पोलिसांवरही कारवाई 
अनेक पोलिस कर्मचारी स्वतःच्या खासगी वाहनांवर "महाराष्ट्र पोलिस' असा लोगो वापरतात किंवा नंबरप्लेटवर "पोलिस' असे लिहतात. आता वाहनांवरसुद्धा कारवाई करण्याचे आदेश पोलिस उपायुक्‍त एस. चैतन्य यांनी दिले आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्याही वाहनांवर "पोलिस' लिहलेले असल्यास सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे. 

आकडेवारी 
वर्ष चालान 
2016 6,555 

2017 1,815 

मे 2018 438 

Web Title: nagpur City Traffic Police action on Fancy Number Plates