निम्म्या शहरात पुढील काही दिवस कोरडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जून 2019

नागपूर : शहरावर जलसंकटाची टांगती तलवार असताना आज पुन्हा नवेगाव खैरी जलाशय येथील पम्पिंग स्टेशनचा वीजपुरवठा वादळामुळे खंडित झाला. त्यामुळे शहराच्या जलशुद्धीकरण केंद्रात दुपारनंतर पाणी पोहोचले नसून लक्ष्मीनगर, धरमपेठ, गांधीबाग, धंतोली झोन व बोरियापुरा मुख्य जलवाहिनीअंतर्गत येणाऱ्या वस्त्यात पुढील काही दिवस पाणीपुरवठा होणार नाही.

गेल्या चार दिवसांपासून नवेगाव खैरी जलाशय येथील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. आज या परिसरात आलेल्या वादळाने त्यात आणखी भर टाकली. दुपारी तीनच्या सुमारास आलेल्या वादळाने नवेगाव खैरी जलाशय येथील वीजपुरवठा खंडित झाला. दुरुस्तीसाठी महावितरणने मोठे शटडाउन घोषित केले. वृत्त लिहिस्तोवर महावितरणचे पथक मनसर ते पारशिवनीदरम्यान उच्च दाब वीजवाहिनीवरील बिघाड शोधत होते. खैरी येथील पम्पिंग स्टेशन बंद झाले असून शहरातील पेंच 1, पेंच 2, पेंच 3 या जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा बंद झाला. जलकुंभ भरण्याइतकेही पाणी नसल्याने टॅंकरनेही पाणीपुरवठा शक्‍य नसल्याचे ओसीडब्ल्यू, मनपाने कळविले आहे. त्यामुळे धरमपेठ, लक्ष्मीनगर, धंतोली, गांधीबाग झोनसह बोरियापुरा मुख्य जलवाहिनीअंतर्गत येणाऱ्या शेकडो वस्त्यांत पुढील काही दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचेही ओसीडब्ल्यूने नमूद केले. वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठा गेल्या सहा दिवसांपासून प्रभावित झाला आहे. गोरेवाडा तलावाच्या पातळीतही घट झाल्याने महापालिकेकडे पाण्यासाठी दुसरा पर्याय नाही. त्यामुळे निम्म्या शहरवासींवर पाणीसंकट ओढवले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur city water problem news