
कोरोनामुळे यावर्षी मार्च महिन्यातील मुख्य परीक्षा लांबल्या. याचाच परिणाम जुलै महिन्यात होणाऱ्या पुरवणी परीक्षांवर झाला. त्यामुळे राज्यात १८ नोव्हेंबर ते १० डिसेंबरदरम्यान बारावी तर २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या.
नागपूर ः दहावीच्या निकालात यावर्षी 26.57 टक्क्यांची वाढ तर उत्तीर्णांची टक्केवारी ९.१४ एवढी वाढली. मात्र, उन्हाळी परीक्षेत वाढलेल्या निकालाटा विचार केल्यास गतवर्षीच्या तुलनेत दहावीत अर्धा तर बारावीच्या निकाल दहा टक्क्याची घट झाल्याचे दिसून येते. दहावीचा निकाल २९.५२ टक्के तर बारावीचा निकाल १८. ६३ टक्के लागला.
कोरोनामुळे यावर्षी मार्च महिन्यातील मुख्य परीक्षा लांबल्या. याचाच परिणाम जुलै महिन्यात होणाऱ्या पुरवणी परीक्षांवर झाला. त्यामुळे राज्यात १८ नोव्हेंबर ते १० डिसेंबरदरम्यान बारावी तर २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. दहावीत विभागातून ४ हजार ६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
त्यापैकी ३ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ हजार १११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावीत ५ हजार ७२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ५ हजार ७१६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ हजार ६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्यावर्षी दहावीचा निकाल ३०.८९ टक्के लागला होता. याशिवाय बारावीचा निकाल २८.३२ टक्के लागता होता.
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, छायांकित प्रती, स्थलांतर आणि फेरमूल्यांकनासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांना http://verification.mh-hsc.ac.in आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थावर उद्या गुरुवारपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना नेट बॅंकिंगचा उपयोग करता येईल. गुणपडताळणीसाठी पन्नास शुल्क तर फेरमूल्यांकनासाठी ३०० रुपये शुल्क भरायचे आहे. पुढील परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे.
दहावी टक्केवारी
बारावी टक्केवारी
संपादन : अतुल मांगे