video : नव्या विचाराची पेरणी! घोड्यावरून नवरी पोहोचली मंडपी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 December 2019

नागपूर : जुने जानकार सांगतात पूर्वी मुलींची वरात काढली जात होती. मुलीकडील कुटुंबीय सर्व तयारी करून मुलीला मुलाच्या घरी लग्नासाठी आणत होते. लग्न सोहळा आटोपल्यानंतर मुलीकडील कुटुंबीय निघून जायचे. मुलीला मुलाकडेच पाठवायचे असल्याने असे केले जात होते. मात्र, कालांतराने यात बदल झाला आणि मुलांची वरात निघायला सुरुवात झाला. आता नवरदेव घोड्यावर स्वार होऊन वाजतगाजत व नाचत लग्न मंडपात जातो. मात्र, "इतिहास अपने आपकों दोहरात हैं' हे नागपुरात झालेल्या विवाह सोहळ्यावरून सिद्ध झाले. 

 

नागपूर : जुने जानकार सांगतात पूर्वी मुलींची वरात काढली जात होती. मुलीकडील कुटुंबीय सर्व तयारी करून मुलीला मुलाच्या घरी लग्नासाठी आणत होते. लग्न सोहळा आटोपल्यानंतर मुलीकडील कुटुंबीय निघून जायचे. मुलीला मुलाकडेच पाठवायचे असल्याने असे केले जात होते. मात्र, कालांतराने यात बदल झाला आणि मुलांची वरात निघायला सुरुवात झाला. आता नवरदेव घोड्यावर स्वार होऊन वाजतगाजत व नाचत लग्न मंडपात जातो. मात्र, "इतिहास अपने आपकों दोहरात हैं' हे नागपुरात झालेल्या विवाह सोहळ्यावरून सिद्ध झाले. 

 

असे का घडले? - दोन दिवसांपूर्वी झाली होती बेपत्ता, अखेर सापडला मृतदेह

विवाह सोहळ्यात नवरदेवाची घोड्यावर रुबाबात आणि थाटामाटात वरात निघणार.. नवरी मात्र, खाली मान घालून लाजत मुरडत लग्नमंडपात येणार... नवरदेवप्रमाणे नवरीलाही वरातीत घोड्यावर बसण्याची इच्छा असते. परंतु, बहुतांश मुली ही इच्छा बोलून दाखवत नाही. ही प्रथा मोडीत काढीत मुलींनीही मस्त वाजतगाजत थाटात वरात काढून तेवढ्याच तोऱ्यात लग्नमंडपी प्रवेश करावा या विचारातून शहरात प्रथमच नववधूने घोड्यावरून मंडपात पोहोचून अनेकांना आश्‍चर्याचा धक्का दिला. शिवाय नव्या विचाराची पेरणीही केली. नवरा मुलगा घोड्यावरून लग्नमंडपात पोहोचण्याच्या पुरुषप्रधान परंपरेला छेद देणारे दृश्‍य रविवारी यानिमित्त नागपूरकरांनी अनुभवले. 

आयुर्वेदिक कॉलेज ले-आउट येथील राजाभाऊ खेडीकर यांची इंजिनिअर कन्या खुशबूचा विवाह तुमसर येथील दिलीपराव सोनेवाले यांचा मुलगा ज्ञानेश्‍वर यांच्याशी रविवारी सायंकाळी पार पडला. रेशीमबाग येथील जैन कलार समाज भवनात आयोजित हा विवाह समारंभ नववधूच्या घोड्यावरून वरातीमुळे आगळावेगळा ठरला. आयुर्वेद कॉलेज ले-आउटमधील राहत्या घरून वधू खुशबूने घोड्यावरून वरात काढण्याचा निर्धार केला. लाडक्‍या लेकीची इच्छा पूर्ण करण्यासाठी पालकही आनंदाने पुढे सरसावले. 

सक्करदरा चौक ते रेशीमबाग चौकापर्यंत घोड्यावरून नववधूची वरात निघाली. वाजत-गाजत निघालेल्या या वरातीत वऱ्हाडींनी नृत्य करीत नवरीला लग्नमंडपी आणले. या वेळी नवरदेव दुसऱ्या एका घोड्यावर वरातीसह मंडपात पोहोचला. मात्र, घोड्यावर नवरी मुलगी बघून अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. घरातील तसेच वऱ्हाडी मंडळींतही नवरी मुलगी घोड्यावर कशी बसणार, याबाबत उत्सुकता होती. 

हेही वाचा - कौतुकास्पद! नवरदेवाऐवजी निघणार नवरीची वरात 

नवऱ्या मुलाप्रमाणे स्वागत

मंगल कार्यालयात पोहोचताच नववधूचे नवऱ्या मुलाप्रमाणे स्वागत करण्यात आले. नवरी मुलगी घोड्यावर बसून मंडपी पोहोचण्याचा नागपुरातील हा पहिलाच प्रसंग असल्याने अनेकांनी मोबाईल कॅमेरात हा क्षण टिपला तर काहींनी व्हिडिओ तयार केला. नवरी खुशबूने नव्या पिढीतील तरुणींना लग्नातील आनंद साजरा करण्याचा एक मार्ग दाखविल्याची चर्चा यानिमित्त रंगली होती. 

Image may contain: 6 people, people smiling, people standing

वरातीला बघण्यासाठी गर्दी

लग्नसोहळ्यात अमाप पैसा खर्च करीत नवरीला डोलीमध्ये आणण्याचे प्रकार विदर्भात वाढले आहेत. नववधू (नवरी) साजशृंगार करून घोड्यावर स्वार होऊन वाजतगाजत, नाचत व आतषबाजी करीत वरात काढून लग्नमंडपी येणार असल्याचे समजताच छोटा ताजबाग परिसरात या आगळ्या वेगळ्या वरातीला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. 

 

हे वाचा - नवरीची निघाली घोड्यावरून वरात 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur : The girl going to ride a horse