बदलले ऋतुचक्र! "खुलता कळी खुलेना'

मंगेश गोमासे
शनिवार, 7 डिसेंबर 2019

नागपूर : आमच्या घरच्या मोगऱ्याला हल्ली फुलेच येत नाही. अहो काही वर्षांपूर्वी शेवंतीला पाने कमी आणि फुलेच जास्त राहायची, त्यामुळे फुले विकत घ्यायची आम्हाला गरज भासत नव्हती, असे संवाद महिलांच्या बोलण्यातून ऐकू येतात. शहरातील उद्यानातही आता फुले दिसत नाहीत. यावर्षी दीड महिना लांबलेल्या पावसाने फुलांच्या झाडाची कळी खुलता खुलत नसल्याचे चित्र आहे. हे सर्व प्रकार बदलते ऋतुमान आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

निसर्गात ऋतूनिहाय फळ, फुले आणि भाजीपाला उपलब्ध होत असतात. यामुळे त्या-त्या मोसमात त्याचा आस्वाद घेण्याची मजा औरच असते. याप्रमाणेच ऋतूनिहाय फुलणाऱ्या फुलांनाही तेवढेच महत्त्व आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून वातावरणात झालेल्या बदलाने प्रत्येक ऋतू जवळपास एक ते दीड महिने उशिराने येत असल्याचे चित्र आहे. याचे उदाहरण म्हणजे साधारणत: जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान पडणारा पाऊस आता वेळेत येत नाही. शिवाय हिवाळ्यातील थंडीही सुरू होण्याचा महिन्यात बदल झालेला आहे. साधारणत: हिवाळा हा ऋतू लिली, शेवंती, कॅलेंडुला, गुलाब, झिनिया यासारख्या फुलांचा फुलण्याचा काळ असतो. मात्र, गेल्या दोन वर्षांत थंडीची चाहूल जरा उशिराच लागत असल्याने या झाडांना कळ्या येऊनही त्या फुलत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडणारी थंडी डिसेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात सुरू झाल्याने गार्डनमध्ये असलेल्या या फुलांच्या झाडांना अद्याप फुलेच आली नाहीत. ग्लोबल वॉर्मिंगची ही खरी सुरुवात असून त्यामुळे ऋतुचक्रात बदल होत असल्याचे हे परिणाम असल्याचे हिस्लॉपच्या वनस्पतिशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मोसमी भोवाल यांनी सांगितले. 

हिस्लॉपच्या प्रदर्शनालाही फटका 
हिस्लॉप महाविद्यालयात जवळपास 14 हजारावर फुलझाडांचा समावेश असलेले प्रदर्शन लावण्यात आलेले आहे. या प्रदर्शनात जवळपास शेवंतीच्या फुलझाडांचे 70 प्रकार ठेवण्यात आले आहेत. शिवाय लिली, कॅलेंडुला, झिनिया यासह इतर फुलझांडाचा समावेश आहे. मात्र, यापैकी बऱ्याच फुलझाडांच्या कळ्या थंडीची चाहूल उशिरा लागल्याने फुलल्या नसल्याचे दिसून येते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, global warming, flowers not blossoming on time