महिला सशक्तीकरणात जगातील 26 शहरात नागपूर

महिला सशक्तीकरणात जगातील 26 शहरात नागपूर

नागपूर : जगातील 26 शहरे महिला सशक्तीकरणाचे प्रतीक असून यात नागपूरचाही समावेश करण्यात आला आहे. महापौर नंदा जिचकार यांच्यामुळे टोकियो, पॅरिस, सिडनी, बर्लिन, बार्सिलोना, स्टॉकहोमसारख्या शहरांच्या यादीत स्थान देण्यात आल्याने संत्रानगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. यानिमित्त महापौर नंदा जिचकार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, गव्हर्नर, महापौर ही महत्त्वाची पदे महिला भूषवित असून नॅशनल जिओग्राफिकने त्याची दखल घेतली आहे. जगातील 26 शहरांचे नेतृत्व महिला करीत आहेत. यात भारतातील राची व नागपूर या दोन शहरांचा समावेश आहे. 26 शहरांच्या यादीत नागपूर 16 व्या क्रमांकावर आहे. यात जपानमधील टोकियो शहराच्या गव्हर्नर युरिको कोईके असून पॅरिसमध्ये ऍनी हिल्डांगो पहिल्यांदाच महिला महापौर आहेत. क्‍युबातील हवाना शहराच्या महापौरपदी मार्टा हर्नांडेज रोमेरो विराजमान आहेत. ऑस्ट्रेलियातील सिडनी शहराच्या पहिल्या महिला महापौर म्हणून क्‍लोवर मूर कार्यरत असून गेल्या 15 पंधरा वर्षांपासून शहराचे नेतृत्व करीत आहेत. जपानमधील समुद्रकिनाऱ्यावरील तोबा शहरातील मासेमाऱ्यांसाठी काम करणाऱ्या ऍमा यांचाही या यादीत समावेश आहे. जर्मनीतील बर्लिन शहरावर चान्सलर ऍन्जेला मरकेल यांचे गेल्या 14 वर्षांपासून एकछत्र राज्य आहेत. त्या "क्‍लायमेट चेंज'च्या दुष्परिणामातून नागरिकांना सावध करीत आहेत. कर्स्टी कालजुलेड या इस्टोनियाच्या पहिला महिला राष्ट्राध्यक्ष आहेत. माल्टाच्या राष्ट्राध्यक्ष मॅरी लुईस कोलरो या आहेत. चीनमधील लुजू लेकच्या किनाऱ्यावरील तिबेटियन बौद्ध समाजासाठी कार्यरत असलेल्या युनान यांच्याही नावाचा पावरफूल महिला म्हणून समावेश करण्यात आला आहे. आईसलॅंडच्या पंतप्रधान कॅटरीन जॅकोबदोतीर या रेकजेविक शहराचे नेतृत्व करतात. अर्ना सोलबर्ग नार्वेच्या पंतप्रधान आहेत. मोनिका फेन या अर्जेटिनातील रोसारिओ शहराच्या महापौर आहेत. याशिवाय जगातील इतर शहरांच्याही महिला महापौरांचा समावेश नॅशनल जिओग्राफिकने केला आहे. भारतातील नागपूरचा यादीत समावेश असून नंदा जिचकार यांच्या नावाची उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय रांची शहराच्या आशा लाकरा या महापौरांचेही नाव या यादीत आहे. न्यूझीलंड, बुल्गेरिया, रोमानिया, स्विडन, स्पेन, नामिबिया, इंडोनेशिया आदी देशांतील शहरांचे नेतृत्व करणाऱ्या महिलांचीही दखल घेण्यात आली आहे.
महिला बळकटीकरण महत्त्वाचे असून नॅशनल जिओग्राफिकने 26 देशांतील शहरात नागपूरची दखल घेणे ही मोठी उपलब्धी आहे. विकासाच्या प्रक्रियेत असल्याने विकासाची दिशा बदलून आपल्या शाश्‍वत विकासाकडे वळणे शक्‍य आहे. महिला महापौर म्हणून विकसित देशात मोठा मान आहे. त्यामुळे तेथील विकासाचा अभ्यास करून शहरात विविध उपक्रम, प्रकल्प राबविण्याची मोठी संधी मिळत आहे.
- नंदा जिचकार, महापौर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com