नागपूर, अजनी रेल्वेस्थानकावर कडेकोट सुरक्षा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

नागपूर  : धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी देशविदेशातील अनुयायी नागपुरात येत असतात. गर्दीच्यावेळी कोणतीही अनुचित घटना घडून नये, यादृष्टीने विशेष काळजी घेण्यात येत आहे. नागपूर व अजनी रेल्वेस्थानकांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात राहणार असून, प्रत्येक संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. याशिवाय प्रवाशांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने आवश्‍यक उपाययोजना करण्याचे निर्देश विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांनी दिले.धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यादरम्यान रेल्वेस्थानक आणि रेल्वेगाड्यांमध्ये अतिरिक्त गर्दी असते.

नागपूर  : धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी देशविदेशातील अनुयायी नागपुरात येत असतात. गर्दीच्यावेळी कोणतीही अनुचित घटना घडून नये, यादृष्टीने विशेष काळजी घेण्यात येत आहे. नागपूर व अजनी रेल्वेस्थानकांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात राहणार असून, प्रत्येक संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. याशिवाय प्रवाशांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने आवश्‍यक उपाययोजना करण्याचे निर्देश विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांनी दिले.धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यादरम्यान रेल्वेस्थानक आणि रेल्वेगाड्यांमध्ये अतिरिक्त गर्दी असते. ही बाब लक्षात घेऊन मुंबई व पुणे मार्गावर विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. काही गाड्यांना अतिरिक्त डबे जोण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज तिवारी आणि एन. के. भंडारी यांच्या नेतृत्वात विशेष कार्य समिती स्थापन केली आहे. सोबतच परिस्थितीवर नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या ठरवून दिल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, अतिरिक्त गर्दीच्या वेळी चोवीस तास प्रवाशांच्या सुविधेच्या दृष्टीने प्रयत्नरत राहतील. याशिवाय आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास ती हाताळण्यासह प्रथमोपचाराचीही व्यवस्था करण्यात आली असून, रुग्णवाहिकाही तैनात राहील. सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे सुरक्षा दल व लोहमार्ग पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात राहील. चोरीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी साध्या वेशातील जवानही गर्दीत असतील. सीसीटीव्हींद्वारे गर्दीवर लक्ष ठेवले जाईल. याशिवाय अतिरिक्त तिकीट खिडक्‍या, उद्‌घोषणा प्रणालीवरून सतत गाड्यांची माहिती प्रसारित करण्याची व्यवस्था केली आहे. गाड्यांमध्येही विशेष तिकीट तपासणी पथक राहील. पिण्याच्या पाण्याची अतिरिक्त व्यवस्था राहील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur, Kodakot security at Ajni railway station