पटोले तुम्ही संन्यास घ्याच - गडकरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

‘नागपूर लोकसभा मतदारसंघातून पाच लाखांच्या मताधिक्‍याने जर मी निवडून आलो नाही तर राजकारणातून संन्यास घेईन’, असे बोलणाऱ्या नाना पटोले यांनी आता आपला शब्द पाळून संन्यास घ्यावाच. अन्यथा जनता त्यांना संन्यास घेण्यास भाग पाडेल,’’ असे नितीन गडकरी आज ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले.

नागपूर - ‘नागपूर लोकसभा मतदारसंघातून पाच लाखांच्या मताधिक्‍याने जर मी निवडून आलो नाही तर राजकारणातून संन्यास घेईन’, असे बोलणाऱ्या नाना पटोले यांनी आता आपला शब्द पाळून संन्यास घ्यावाच. अन्यथा जनता त्यांना संन्यास घेण्यास भाग पाडेल,’’ असे नितीन गडकरी आज ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले. 

नागपुरात पराभूत झाल्यानंतर पटोले आता विधानसभा निवडणुकीत कदाचित भंडाऱ्यातून नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतील. पण तेथेही जनता त्यांना ‘हात’ देणार नाही. त्यामुळे त्यांनी आताच राजकीय संन्यास घेणे बरे राहील, असा टोलाही त्यांनी हाणला. मतमोजणीच्या आदल्याच दिवशी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी विजयाचा दावा केला होता, तो फोल ठरला. निवडणूक प्रचारादरम्यान पटोले यांनी अहंकारी, उद्धट आणि उर्मटपणाच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या. अशा उर्मट व्यक्तीला भंडाऱ्यातीलच काय कुठलीही जनता निवडून देणार नाही, असे ते म्हणाले. 

गडकरी म्हणाले की, ‘बसप’च्या २०१४ च्या निवडणुकीत उमेदवाराने ९८ हजार मते घेतली होती. ती या वेळी कमी होऊन ३० हजारांवर आली. अल्पसंख्याकांची जास्तीत जास्त मते काँग्रेसला गेली. त्यामुळे या वेळी मतविभाजन झाले नाही. याचा अर्थ दलित, मुस्लिम आणि ख्रिस्ती समुदायाचा विश्‍वास संपादन करण्यात कुठेतरी कमी पडलो, याची जाणीव झाली. हा विश्‍वास संपादन करण्याचा यापुढे प्रयत्न केला जाईल. मोदींची सुप्त लाट होतीच हे या निकालाने स्पष्ट झाले, असे त्यांनी सांगितले.

या वर्षीचा दुष्काळ शेवटचा 
या वर्षी महाराष्ट्रातला दुष्काळ हा शेवटचा दुष्काळ असेल. कारण पुढील पाच वर्षात नदीजोड प्रकल्प राबविला जाईल. नद्यांतून वाहून समुद्रात जाणारे पाणी रोखून संचय करण्यात येईल. जायकवाडी धरण १०० टक्के भरण्यात येईल. पाणी ही मोठी समस्या आहे. ती पुढच्या वर्षी उद्धभवू देणार नाही, असा विश्‍वास गडकरी यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur Loksabha Constituency Nana Patole Nitin Gadkari Politics