नागपूर मेट्रो "नंबर वन'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

नागपूर मेट्रो "नंबर वन'
नागपूर : मेट्रो प्रकल्प कामाच्या अतिवेगामुळे सर्वस्तरातून कौतुक होत असलेल्या नागपूर मेट्रोने केंद्र, राज्य सरकारतर्फे आयोजित तीनदिवसीय अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेवरही छाप पाडली. नागपूर मेट्रोने परिषदेत "बेस्ट एक्‍झीबिटर' वर्गात पहिला पुरस्कार पटकावला. या पुरस्कारामुळे नागपूर मेट्रोचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

नागपूर मेट्रो "नंबर वन'
नागपूर : मेट्रो प्रकल्प कामाच्या अतिवेगामुळे सर्वस्तरातून कौतुक होत असलेल्या नागपूर मेट्रोने केंद्र, राज्य सरकारतर्फे आयोजित तीनदिवसीय अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेवरही छाप पाडली. नागपूर मेट्रोने परिषदेत "बेस्ट एक्‍झीबिटर' वर्गात पहिला पुरस्कार पटकावला. या पुरस्कारामुळे नागपूर मेट्रोचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेच्या समारोपीय समारंभात रविवारी विविध संस्थांना उत्तम शहरी वाहतूक नियोजन, रस्ते सुरक्षा, नॉन मोटराईज्ड वाहतुकीसाठी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार विभागातर्फे सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यात नागपूर मेट्रोला बेस्ट एक्‍झीबिटर वर्गात पहिला पुरस्कार देण्यात आला. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार विभागाचे सचिव संजय मूर्ती यांच्या हस्ते गौरवचिन्ह व प्रमाणपत्र स्वीकारले. याच वर्गात दुसरा पुरस्कार "चलो' या उपक्रमाला तर तिसरा पुरस्कार "अल्ट्रा पीआरटी लिमिटेड'ला देण्यात आला. विविध वर्गात उत्तम काम करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देण्यात आले.
पुरस्कारप्राप्त संस्था
- कोची मेट्रो रेल लिमिटेड ः बेस्ट नॉन मोटराईजड ट्रान्सपोर्ट प्रोजेक्‍ट.
- कर्नाटक रस्ते वाहतूक महामंडळ व बंगळुरू महानगर वाहतूक महामंडळ ः बेस्ट सिटी बस सर्व्हिस.
- हैद्राबाद मेट्रो रेल लिमिटेड व सुरत महानगरपालिका ः बेस्ट अर्बन मास्ट ट्राजिंट प्रोजेक्‍ट.
- सुरत महानगरपालिका ः बेस्ट इंटिलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम व आटोमेटीक फेयर कलेक्‍शन सिस्टम.
- मध्य प्रदेश पोलिस ः बेस्ट इनिशिएटीव्ह फॉर इम्प्रूव्हड रोड सेफ्टी.
- अहमदाबाद महानगरपालिका ः बेस्ट सिटी इन अर्बन ट्रान्सपोर्ट इनिशिएटिव्ह.
- बृहन्बंगळुरू महानगरपालिका ः बेस्ट नॉन मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट प्रोजेक्‍ट.
- बिहार रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन व मणिपूर रोड ट्रान्सपोर्ट ः बेस्ट सिटी बस सर्व्हिस.
- अहमदाबाद जनमार्ग लिमिटेड व नवी मुंबई मनपा वाहतूक ः बेस्ट इंटिलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम.
- आंध्र प्रदेश पोलिस ः बेस्ट इनिशिएटीव्ह फॉर इम्प्रूव्हड रोड सेफ्टी.
- सुरत महानगरपालिका व हिमाचल रोड स्टेट ट्रान्सपोर्ट ः बेस्ट सिटी इन अर्बन ट्रान्सपोर्ट इनिशिएटिव्ह.
- हॅकाथॉन स्पर्धा : पहिला पुरस्कार अवनी मेहता; दुसरा पुरस्कार कुशाग्र सिन्हा; उत्तेजनार्थ पुरस्कार : अनुपमा वरीयार आणि मधुर कुकरेजा
- उत्कृष्ट पोस्टर स्पर्धा ः जेनीज जोज

Web Title: Nagpur Metro Number One