नागपूर मेट्रो रेल्वेचा आज 975 कोटींचा करार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

नागपूर - नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला फ्रान्स बॅंकेकडून 975 कोटी रुपयांचे कर्ज मिळणार आहे. याकरिता उद्या गुरुवारी केंद्रीय आर्थिक व्यवहार विभाग, फ्रान्स डेव्हलपमेंट एजन्सी (एएफडी) बॅंक आणि नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्यात दिल्लीत करार होत आहे. 

नागपूर - नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला फ्रान्स बॅंकेकडून 975 कोटी रुपयांचे कर्ज मिळणार आहे. याकरिता उद्या गुरुवारी केंद्रीय आर्थिक व्यवहार विभाग, फ्रान्स डेव्हलपमेंट एजन्सी (एएफडी) बॅंक आणि नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्यात दिल्लीत करार होत आहे. 

दिल्लीतील केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाच्या कार्यालयात दुपारी चार वाजता केंद्र शासनाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे सहसचिव सेल्वा कुमार, भारतातील फ्रान्सचे राजदूत अलेक्‍झेंडर झिग्लर, एएफडी बॅंक समूहाचे दक्षिण आशिया विभागाचे संचालक निकोलस फॉरेंज आणि नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एनएमआरसीएल) व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या उपस्थितीत हा करार होणार आहे. 

करारानुसार नागपूर मेट्रोच्या कामांसाठी एएफडी बॅंक 20 वर्षे मुदतीसाठी 975 कोटी रुपये (130मिलियन युरो) कर्ज स्वरूपात देणार आहे. कर्ज रूपाने उपलब्ध होणाऱ्या रकमेतून नागपूर मेट्रोचे सिग्नलिंग, टेलिकॉम, ऑटोमॅटिक फेअर कलेक्‍शन सिस्टिम(एएफसी), लिफ्ट आणि एस्केलेटर सुविधा आदी कामे करण्यात येणार आहेत. केंद्र सरकार आणि एएफडी बॅंकेदरम्यान होणाऱ्या करारानंतर नागपूर मेट्राचे या करारासंदर्भातील प्रत्यक्ष काम सुरू होण्याआधी नागपूर मेट्रोरेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एएफडी बॅंकेदरम्यान नागपूर येथे प्रकल्प करार होणार आहे. महाराष्ट्र शासन, केंद्रीय नगरविकास मंत्रालय आणि केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या महत्त्वपूर्ण सहकार्याने एएफडी बॅंक समूहाकडून हे कर्ज उपलब्ध झाले आहे. याआधी नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी जर्मनीची केएफडब्ल्यू बॅंक आणि केंद्र सरकार यांच्यात 3 हजार 750 कोटींचा करार झाला आहे.

Web Title: Nagpur Metro railway today 975 crore contract