डेंगीचा प्रकोप वाढला; साधनाअभावी प्रशासन अपंग 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

नागपूर - शहरात डेंगीचा प्रकोप वाढत आहे. मात्र, साहित्याचा अभाव व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे महापालिकेच्या मलेरिया, फायलेरिया विभाग अपंग झाला आहे. जुलैमध्ये डेंगीचे चार रुग्ण आढळले असून, या रोगावर नियंत्रण ठेवण्यात महापालिका अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. सात महिन्यांत 13 रुग्ण आढळले. 

शहरात डेंगी डोके काढत असून, महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. मनपाच्या फायलेरिया, मलेरिया विभागाकडून डेंगी आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी औषध फवारणी केली जात आहे. मात्र, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे या विभागापुढेही मर्यादा आल्या आहेत. फॉगिंग, अळीनाशक फवारणीसह घरोघरी भेटी देण्यासाठी केवळ 174 कर्मचारी आहेत. याशिवाय साधनांचाही अभाव असल्याचे दिसून येत आहे. 

शहरात धुरफवारणीसाठी आवश्‍यक केवळ 2 मशीन उपलब्ध आहेत. शहरात 5 मशीनची गरज आहे. दोनच मशीन असल्यामुळे मागणी करूनही नगरसेवकांना प्रभागासाठी मशीन मिळत नाही. त्यामुळे नगरसेवकही संताप व्यक्त करीत आहेत. जुलै महिन्यात डेंगीचे 4, मलेरियाचा 1 आणि फायलेरिया अर्थात हत्तीरोगाचे 2 रुग्ण आढळल्याने स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असलेले शहर नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवित नसल्याचे दिसून येत आहे. 

अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष 
वारंवार सांगूनही नागरिक डासअळीची ठिकाणे नष्ट करणार नसतील, तर सबंधितांवर गुन्हे दाखल करावे, असे तत्कालीन मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निर्देश दिले. मात्र, या निर्देशाचे पालन एकाही अधिकाऱ्यांनी केल्याचे दिसत नाही. अधिकारीही नागपूरकरांच्या आरोग्यबाबत उदासीन असल्याचेच यानिमित्त अधोरेखित होत आहे. 

Web Title: nagpur new dengue