नरखेडमध्ये "वंदे मातरम्‌'वरून डॉक्‍टराला जमावाची मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

नरखेड - "वंदे मातरम्‌ बोलो, "भारत माता की जय' असा संदेश व्हॉट्‌सऍपवरून फॉरवर्ड केल्यावरून येथील एका डॉक्‍टरला जमावाने मारहाण करून नग्न केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. डॉ. सुभाष ज्ञानेश्‍वर वाघे (वय 40,नरखेड) असे या डॉक्‍टराचे नाव आहे. 

नरखेड - "वंदे मातरम्‌ बोलो, "भारत माता की जय' असा संदेश व्हॉट्‌सऍपवरून फॉरवर्ड केल्यावरून येथील एका डॉक्‍टरला जमावाने मारहाण करून नग्न केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. डॉ. सुभाष ज्ञानेश्‍वर वाघे (वय 40,नरखेड) असे या डॉक्‍टराचे नाव आहे. 

डॉ. खाडे यांना अज्ञात व्यक्तीच्या व्हॉट्‌सऍपवरून "वंदे मातरम्‌ बोलो, भारत माता की जय' असा संदेश आला. हा संदेश त्यांनी सिद्दीकी नामक व्यक्तीला व्हॉट्‌सऍपवर फॉरवर्ड केला. सिद्दीकी यांनी हा संदेश पुढे फॉरवर्ड केला. यानंतर युवकांच्या एका टोळक्‍याने डॉ. वाघे यांच्या दवाखान्यावर हल्ला चढवला. दवाखान्यात तोडफोड करून त्यांना चोप दिला. यानंतर त्यांना बाहेर ओढून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करीत ऋषीश्‍वर तलावाकडील रामेश्‍वर शेंदरे यांच्या घरापर्यंत फरपटत नेत नग्न केले. 

या घटनेची माहिती मिळताच ठाणेदारांसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिस आल्याचे बघून डॉक्‍टरांना मारहाण करणाऱ्यांनी पळ काढला. परंतु, नंतर तिघांना अटक करण्यात आली. या प्रकरणी डॉ. सुभाष वाघे यांच्या तक्रारीवरून अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रामेश्‍वर शेंदरे यांच्या घरासमोर मारहाण झाल्याने त्यांनीही तक्रार केली आहे. या प्रकारानंतर तणावाची परिस्थिती उद्भवू नये म्हणून अतिरिक्त पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी दंगल नियंत्रक ताफ्यासह चौकाचौकांत तैनात आहेत. 

काही दिवसांपूर्वी गोमांस विक्रीच्या संशयावरून सलीम शेख शहा याला भारसिंगी येथे मारहाण केल्यावरून गोरक्षकांना अटक झाली होती. शहा याला पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले होते. 

Web Title: nagpur new narkhed vande mataram doctor