105 टुल्लू पंप जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

नागपूर - उन्हाळा लागताच टुल्लूपंपद्वारे पाणीचोरीच्या घटनांत वाढ झाली असून, त्यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत आहे. महापालिका व ओसीडब्ल्यूने 105 टुल्लूपंप जप्त करीत पाणीचोरट्यांना दणका दिला. विशेष म्हणजे सुशिक्षितांच्या धंतोलीत सर्वाधिक 26 टुल्लूपंप जप्त करण्यात आले. 

नागपूर - उन्हाळा लागताच टुल्लूपंपद्वारे पाणीचोरीच्या घटनांत वाढ झाली असून, त्यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत आहे. महापालिका व ओसीडब्ल्यूने 105 टुल्लूपंप जप्त करीत पाणीचोरट्यांना दणका दिला. विशेष म्हणजे सुशिक्षितांच्या धंतोलीत सर्वाधिक 26 टुल्लूपंप जप्त करण्यात आले. 

टुल्लूपंपामुळे अनेकांकडे कमी दाबाने पाणी येत असून, पाण्यासाठी ओरड होते. मनपा-ओसीडब्ल्यूने शहरात टुल्लूपंप जप्तीची मोहीम सुरू केली. टुल्लूपंप जप्तीसह नळजोडणी बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. गेल्या काही दिवसांत महापालिका व ओसीडब्ल्यूने 105 टुल्लूपंप जप्त केले. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात टुल्लूपंपचा वापर वाढल्याने पाणीटंचाई वाढल्याचे चित्र आहे. या कृत्रिम पाणीटंचाईचे खापर मनपावर फोडले जात असल्याने प्रशासनाने कारवाई सुरू केली. सर्वाधिक पंप धंतोलीतून जप्त करण्यात आले असून, त्याखालोखाल लकडगंजमध्ये 22 पंप जप्त करण्यात आले. पाणी वळविणे कायदेशीर गुन्हा असून असे करणाऱ्यास 5 वर्षांपर्यंत कारावास व दंडाची तरतूद आहे. 

झोननिहाय कारवाई 
झोन जप्त टुल्लूपंप परिसर 
लक्ष्मीनगर 9 गोपालनगर, सिंधी कॉलनी, जयताळा 
धरमपेठ 6 सिव्हिल लाइन्स, सुरेंद्रगढ, अंबाझरी टेकडी, आंबेडकरनगर 
हनुमाननगर 2 भीमनगर, नालंदानगर 
धंतोली 26 लभानतांडा, विश्‍वकर्मानगर, सावित्रीबाई फुलेनगर, जुनी शुक्रवारी, रघुजीनगर, सोमवारी क्वार्टर, अशफाक उल्ला मार्ग 
नेहरूनगर 10 न्यू डायमंडनगर, बेलदारनगर, दर्शन कॉलनी, आशीर्वादनगर, सद्‌भावनानगर 
गांधीबाग 1 दसरा रोड 
सतरंजीपुरा 7 तांडापेठ, लाल दरवाजा, शांतीनगरातील तेलीपुरा, राजीव गांधीनगर 
लकडगंज 22 सतरंजीपुरा, ठवकरवाडी, सुभाननगर, साईनगर, बगडगंज, सद्‌गुरूनगर, पारडी 
आशीनगर 13 महावीरनगर, चॉक्‍स कॉलनी, भागाबाई ले-आउट, नारा 
मंगळवारी 9 पेन्शननगर, बोरगाव, अयप्पानगर. 

Web Title: nagpur news 105 Tulu Pum seized