कॅन्सर रुग्णालयासाठी २० कोटींची तरतूद

कॅन्सर रुग्णालयासाठी २० कोटींची तरतूद

नागपूर - तत्कालीन आमदार देवेंद्र फडणवीस यांनी २०१२ च्या हिवाळी अधिवेशनात मेडिकलमध्ये उपचाराला येणाऱ्या कॅन्सरग्रस्तांचा लढा विधिमंडळात पोहचवला होता. कॅन्सरग्रस्तांची व्यथा मांडल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेडिकलमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्याची घोषणा केली. पाच वर्षे उलटून गेल्यानंतरही कॅन्सर इन्स्टिट्यूट कागदावरच आहे, असे वृत्त ‘सकाळ’ने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रकाशित केले. पाच वर्षांनंतर सामाजिक न्याय विभागाच्या आर्थिक सहकार्यातून मेडिकलमध्ये १०० कोटींचे कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून पुरवणी मागण्यांतून २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. 

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन नागपुरात आले की, कॅन्सर इन्स्टिट्यूट संदर्भात पाठपुरावा केला जात होता. विशेष असे की, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांचे योगदान आहे. कॅन्सर इन्स्टिट्यूटसाठी मेडिकलचे कॅन्सररोग विभागप्रमुख डॉ. कृष्णा कांबळे यांच्याकडून सुमारे सात वेळा प्रस्ताव तयार करण्यात आले. त्यावेळी डॉ. कांबळे सेवेत होते. पाच वर्षांनंतर ते निवृत्त झाले. मात्र त्यांनी दै. ‘सकाळ’च्या कात्रणांसह कॅन्सर इन्स्टिट्यूटचा न्यायालयीन लढा सुरू केला. २१ जून २०१७ रोजी न्यायालयाने दोन वर्षांत कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारावे, असे निर्देश दिले. यानंतर कॅन्सर इन्स्टिट्यूटचे भूमिपूजन कधी हा सवाल ‘सकाळ’च्या वृत्तातून पुढे आणला. डॉ. कांबळे यांच्यासहित त्यांचे सहकारी आणि सद्याचे विभागप्रमुख डॉ. अशोक दिवाण, डॉ. विजय मोहबिया यांनी ‘सकाळ’चे आभार व्यक्त केले. 

मेडिकलच्या कॅन्सर विभागात उपचारासाठी रुग्ण येतात. शासनाने २० कोटीचा निधी मंजूर केला. यामुळे आता मेडिकलमधील कॅन्सर रुग्णालय तयार होईल. कॅन्सरग्रस्ताना दिलासा मिळाला आहे. कॅन्सरग्रस्तांच्या वेदनांवर ही एकप्रकारची फुंकर आहे. यासाठी ‘सकाळ’ने कॅन्सर इन्स्टिट्यूटचा प्रश्‍न लावून धरला. 
- डॉ. कृष्णा कांबळे, ज्येष्ठ कॅन्सररोग तज्ज्ञ, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com