इंग्लंडमध्ये पाठविलेल्यांपैकी २० जणांचा लागला शोध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

नागपूर - बनावट व्हिसा व पासपोर्ट बनवून इंग्लंडमध्ये मानव तस्करी केलेल्या ५० तरुणांपैकी २० जणांचा शोध लागला असून, ३० तरुणांचा शोध ब्रिटिश प्रशासन घेत आहे. या प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी शिरील मॉरीस जॉन (रा. सुगतनगर, जरीपटका) याला अटक केली. आतापर्यंत १० आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी रुल्डासिंग गुज्जर, बलवीरसिंग मुलतानी, अजितसिंग मुलतानी, मंजितसिंग गोतरा, सतविंदरसिंग गोतरा, प्यारासिंग गोतरा, जर्नलसिंग गोतरा, राजींदरसिंग अटवाल व बनावट कागदपत्रे तयार करणारा शिवकुमार राठोर यांना गुन्हे शाखेने अटक केली. सर्व आरोपींनी तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून बनावट कागदपत्राद्वारे व्हिसा आणि पासपोर्ट मिळवून दिला. इंग्लंडमध्ये नेल्यानंतर तेथे मॉल्स, कारखाना, कंपन्या तसेच खासगी लोकांकडे चालक, नोकर, सफाई कर्मचारी अशी कामे करण्यास भाग पाडून युवकांची फसवणूक केली. या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली होती. 

नागपुरातील युवक इंग्लंडसह कॅनडा, जपान, युरोप अशा अन्य राज्यांतही पाठविण्यात येते होते. मुलगा बनवून नेणारे तोतया आईवडील एकटेच परत येत होते. ब्रिटिश उपउच्चायुक्‍त कार्यालयाच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर नागपूर पोलिसांनी आदेशानंतर गुन्हे दाखल केले. इंग्लंडमध्ये बेपत्ता तरुणांचा शोध घेण्यात आला.

Web Title: nagpur news 20 person discoved in england