‘लॉ युनिव्हर्सिटी’ला दोनशे कोटी - सीएम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

नागपूर - शहरात दर्जेदार शिक्षण संस्था आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहेत. नागपुरात लॉ युनिव्हर्सिटी सुरू झाली. आता या युनिव्हर्सिटीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून ७५० कोटींचा खर्च येणार आहे. पहिल्या टप्प्यात दोनशे कोटींची कामे केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. नवीन विमानतळाचे काम दोन महिन्यांत सुरू होणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. 

नागपूर - शहरात दर्जेदार शिक्षण संस्था आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहेत. नागपुरात लॉ युनिव्हर्सिटी सुरू झाली. आता या युनिव्हर्सिटीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून ७५० कोटींचा खर्च येणार आहे. पहिल्या टप्प्यात दोनशे कोटींची कामे केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. नवीन विमानतळाचे काम दोन महिन्यांत सुरू होणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. 

मनीषनगर येथे उड्डाणपूल व अंडरपासचे भूमिपूजन, बेलतरोडी पोलिस स्टेशन तसेच प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे उद्‌घाटन, २० पाणीपुरवठा योजनांच्या भूमिपूजन आज श्‍यामनगर येथील नासुप्र मैदानावर त्यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, महापौर नंदा जिचकार, जि. प. अध्यक्ष निशा सावरकर, खासदार कृपाल तुमाने, खासदार डॉ. विकास महात्मे, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्‌, सहआयुक्त शिवाजी बोडखे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे विभागीय अधिकारी एम. चंद्रशेखर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, आमदार, नगरसेवक उपस्थित होते. ते म्हणाले, लॉ युनिव्हर्सिटी शहरात सुरू आहे. मात्र, आता या युनिव्हर्सिटीचे सुंदर कॅम्पस तयार होईल. या युनिव्हर्सिटीच्या कामांना वेग देण्यात येत आहे. याशिवाय नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाच्या निविदा काढल्या असून दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. त्यामुळे खऱ्या अर्थाने कार्गो  हबला सुरुवात होईल. याशिवाय नासुप्रच्या डीपी रोडलाही मान्यतेसह ६५ कोटी रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली. मनीषनगर उड्डाणपुलाचे भूमिपूजन म्हणजे माझ्या स्वप्नाची पूर्तता झाली. गेल्या दहा वर्षांपासून या परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या उड्डाणपुलासाठी प्रयत्न केले. या उड्डाणपुलाचे डिझाइन संपूर्ण राज्यात अभिनव असल्याचेही त्यांनी नमूद केले. या वेळी त्यांनी पोलिस आयुक्त व्यंकटेशम्‌ यांच्या कामाची प्रशंसा केली. 

मनीषनगर उड्डाणपूल प्रकल्पग्रस्तांना घरे 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मनीषनगर उड्डाणपुलासाठी ज्यांची घरे जातील, त्यांना घरे दिले जाईल, अशी घोषणा केली. त्यांचे पुनर्वसन केल्याशिवाय हा प्रकल्पही पूर्णत्वास जाणार नाही. त्यांना घरे देण्यास शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. 

पोलिसांसाठी १०० कोटी द्या - पालकमंत्री
आतापर्यंत नागपूर पोलिसांना ७५० कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी दिले. आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा निधी आहे. परंतु, आणखी १०० कोटी शिल्लक असून तोही द्यावा, अशी मागणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून हा निधी देण्याचे कबूल केले.

Web Title: nagpur news 200 crore for law university