३९ हजारांवर शेतकऱ्यांना िदलासा - चंद्रशेखर बावनकुळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ३९ हजार ४४० शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून एवढ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. कर्जमाफीपोटी या शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाने २३७ कोटी रुपये जमा केल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 

नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ३९ हजार ४४० शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून एवढ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. कर्जमाफीपोटी या शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाने २३७ कोटी रुपये जमा केल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 

२८ जून २०१७ अखेरपर्यंत शासनाच्या निकषानुसार ५९३ सहकारी संस्था होत्या. यापैकी ३ राष्ट्रीयकृत बॅंकेला संलग्न तर ३ संस्था अवसायनात असल्याने त्या जिल्हा मध्यवर्ती बॅंक यांच्याकडे ५८७ सेवा सहकारी संस्थांचे एकूण ३८,४४६ लाभार्थी आहेत. जिल्हा बॅंकेकडे ऑनलाईन अर्ज नोंदणीत ३०,६०० अर्ज प्राप्त झाले असून, १ लाख ११ हजार ६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले. यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ३१ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले. १ जानेवारी २०१८ पर्यंत नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील २१,१६४ शेतकऱ्यांची यादी तसेच १४४.६२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम बॅंकेला मिळाली. 

राष्ट्रीयकृत बॅंकेचे १८२७६ ची यादी व ९२.६७ कोटी रुपये बॅंकेला देण्यात आली. एकूण ३९,४४० शेतकऱ्यांना २३७.२९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जबचत खात्यात जमा करण्यात आले असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. उर्वरित शेतकऱ्यांच्या माहितीसंदर्भात तांत्रिक तृटी आहेत. त्या दूर करण्यासाठी तालुका स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. 
एकही शेतकरी माफीपासून वंचित राहू नये, असे शासनाचे प्रयत्न आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना मुदतीत अर्ज करता आला नाही, त्यांना तालुका उपनिबंधक किंवा संबंधित बॅंकेच्या शाखेत अर्ज करता येणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले उपस्थित होते.

Web Title: nagpur news 39000 farmer sat bara empty