विदर्भाच्या पर्यटन विकासासाठी 50 कोटी 

विदर्भाच्या पर्यटन विकासासाठी 50 कोटी 

नागपूर - राज्य शासनाने पूर्व विदर्भातील पर्यटनस्थळाच्या विकासासाठी यावर्षी 50 कोटी 25 लाखांचा निधी मंजूर केला. संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेच्या "शाश्‍वत पर्यटन एक विकासाचे साधन' या घोषवाक्‍याला अनुसरून विदर्भातील पर्यटनाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्त बुधवारी (ता. 27) विमानतळ आणि एमटीडीसीच्या पर्यटन केंद्रात येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात येणार आहे. 

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प, पर्यटक निवास बोथलकसा, पर्यटन निवास वर्धा येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. "सकाळ'ने विदर्भातील पर्यटन विकासाचे मार्केटिंग अथवा धार्मिक पर्यटनाकडे लक्ष केंद्रित करण्याचे वृत्त प्रकाशित करून राज्य शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार जागतिक पर्यटन दिनानिमित्त प्रथमच अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे. विमानतळ, रेल्वे स्टेशनवरही पर्यटनदिनाचे बॅनर लावण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर विभागासाठी 16 उमेदवारांना 12 दिवसांचे गाइड प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यात दोन दिवस प्रत्यक्ष पर्यटनस्थळावर जाऊन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी येथील इको फ्रेण्डली पर्यटक निवास बांधकामासाठी आट कोटींची खर्च अपेक्षित आहे. बोर व्याघ्र प्रकल्पातील एमटीडीसीच्या पर्यटन निवासाचे विस्तारीकरण केले जात आहे. केळझर या पर्यटनस्थळांचा विकासासाठी 4 कोटी 95 लाख, हिंगणा तालुक्‍यातील रायपूर येथील पर्यटन विकास व सौंदर्यीकरणासाठी 4 कोटी 77 लाखाच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. येथे फूड कोर्ट, बोट जेस्टी आदी पायाभूत सुविधा बांधण्यात येणार आहेत. हिंगणा तालुक्‍यातील वेणा नदी येथील पर्यटन विकास व सौंदर्यीकरणासाठी 4 कोटी 77 लाख रुपये मंजूर केले आहेत. 

काटोल तालुक्‍यात जाम नदी प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासाठी 2 कोटी 74 लाख, श्री. सती अनसूया माता संस्थान पारडसिंगा, ता. काटोल येथील विकासकामासाठी 52 लाख, कामठी तालुक्‍यातील घोरपड आणि धानला येथील तलावाच्या सौंदर्यीकरण व जलतरण क्रीडा केंद्रासाठी 5 कोटी 80 लाख, गोंदिया जिल्ह्यातील चोरखमारा येथील पर्यटन संकुलाच्या बांधकामासाठी 6 कोटी 52 लाख, चिमूर तालुक्‍यातील अंबोली येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विकासकामासाठी 2 कोटी 53 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

खाण पर्यटन ऑक्‍टोबरपासून 
सावनेर जवळील गोंडेगाव येथील भूमिगत खाणींचे पर्यटन यंदाही ऑक्‍टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये जमिनीखाली 200 ते 300 मीटर खोल अशा क्षेत्रातील अद्‌भुत विश्‍वाची सफर पर्यटकांना करता येणार आहे. या सहली शुक्रवार, शनिवार आणि रविवारी आयोजित करण्यात येणार आहेत, असे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक हनुमंत हेडे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com