आठ शाळांची बससेवा बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

नागपूर - शालेयस्तरावरील स्कूलबस समितीबाबत शपथपत्र दाखल न करणाऱ्या आठ शाळांची स्कूलबस सेवा गुरुवारपासून (ता. ११) बंद करण्याचा, आदेश बुधवारी (ता. २०) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. यामध्ये रॅडक्‍लिफ स्कूल, संस्कार इंग्लिश कॉन्व्हेंट, संस्कार विद्यानिकेतन, शिवमुद्रा रॉयल स्कूल, न्यू इंदिरा कॉन्व्हेंट, श्रीमती सावित्रीबाई बोरकर मुलींची शाळा, महेश प्राथमिक शाळा आणि फ्रेंड्‌स पब्लिक स्कूल ॲण्ड कॉन्व्हेंट यांचा समावेश आहे. न्यायालयाच्या या आदेशाची अंमलबजावणी प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि शिक्षण उपसंचालकांना करायची आहे. 

वीरथ झाडे या आठ वर्षीय विद्यार्थ्याचा ९ जानेवारी २०१२ रोजी घरापुढेच स्कूल बसखाली चिरडून मृत्यू झाला होता. उच्च न्यायालयाने याप्रकरणाची स्वत:हून दखल घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी झालेल्या मागील सुनावणीदरम्यान न्यायालय मित्र फिरदोस मिर्झा यांनी दंड आणि शपथपत्र दाखल न करणाऱ्यांची माहिती दिली. १३७ शाळांपैकी केवळ ३३ शाळांनी शपथपत्र आणि दंडाची रक्कम जमा केल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयीन आदेशाकडे दुर्लक्ष करत असल्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने शाळेचे मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांनाच दणका दिला होता. आज मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान १३७ पैकी बऱ्याचशा ५२ शाळांनी दंडाची रक्कम आणि शपथपत्र सादर केले नसल्याची माहिती देण्यात आली. शाळेच्या या वर्तनावर न्यायालयाने प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. 

आज झालेल्या सुनावणीदरम्यान आठ शाळांनी शपथपत्र सादर केले नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला. या सर्व शाळांची स्कूलबस सेवा बंद करण्याचा आदेश देण्यात आला. तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना स्वतंत्र शपथपत्र सादर करत त्यामध्ये स्कूलबसची सद्यस्थिती सांगण्याचे निर्देश दिले. तसेच एकच बस वेगवेगळ्या शाळेत वापरले जात आहे का याबाबतदेखील उत्तर सादर करायचे आहे. याप्रकरणी न्यायालय मित्र म्हणून ॲड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.

बससेवा बंद करण्यात आलेल्या शाळा
रॅडक्‍लिफ स्कूल, संस्कार इंग्लिश कॉन्व्हेंट, संस्कार विद्यानिकेतन, शिवमुद्रा रॉयल स्कूल, न्यू इंदिरा कॉन्व्हेंट, श्रीमती सावित्रीबाई बोरकर मुलींची शाळा, महेश प्राथमिक शाळा आणि फ्रेंड्‌स पब्लिक स्कूल ॲण्ड कॉन्व्हेंट.

Web Title: nagpur news 8 schools bus service close