माहिती पुस्तिकांअभावी रखडली प्रवेश प्रक्रिया 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

नागपूर - अकरावी प्रवेशासाठी कालपासून (ता. २९) शाळांमध्ये माहिती पुस्तिकेची विक्री करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक नामदेव जरग यांनी दिली होती. मात्र, शाळा सोडाच, विभागीय उपसंचालक कार्यालयापर्यंत अद्याप माहिती पुस्तिकाच पोहोचल्या नसल्याने सलग दुसऱ्यांदा प्रक्रिया रखडल्याचे दिसून येते.   

राज्यातील काही प्रमुख शहरांत ऑनलाइन पद्धतीने अकरावीचे प्रवेश केले जाणार आहेत. दहावीचा निकाल साधारणत: जूनच्या दुसऱ्या आठवड्यात येतो. त्यापूर्वीच ज्या शाळेतून विद्यार्थ्याने परीक्षा दिली, त्याच शाळेतून त्याला ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी १८ स्वतंत्र केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. मात्र, ऑनलाइन माहिती भरताना नेमके काय करावे, यासंदर्भात माहिती देणारी एक पुस्तिका शिक्षण विभागाद्वारे देण्याचे ठरले होते. माहिती पुस्तिका शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार होत्या. मात्र, अद्याप माहिती पुस्तिका शाळांमध्ये पोहोचलेल्या नाहीत. यासंदर्भात उपसंचालक अनिल पारधी आणि सहायक संचालक डॉ. पटवे यांना संपर्क केला असता, ते फोनच उचलत नसल्याचे चित्र आहे. सध्या http://nagpur.११thadmission.nagpur या संकेतस्थळावर माहिती पुस्तिका वाचण्यासाठी उपलब्ध आहे.  

चार दिवस पुन्हा उशीर
अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा २५ मेपासून सुरू होईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही नियोजनाचा अभाव असल्याने पुन्हा २९ मे तारीख विभागाकडून देण्यात आली. मात्र, सोमवारीही माहिती पुस्तिका उपलब्ध नसल्याने विभागाकडून आता पुन्हा चार दिवस थांबावे लागेल, असे कळविले आहे. 

Web Title: nagpur news admission