नागपूर ‘एम्स’साठी अडीचशे पदे मंजूर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेले अखिल भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (एम्स) पहिल्या वर्षाचे वर्ग २०१७-१८ मध्ये सुरू होणार आहेत. ५० जागांचे प्रवेश होणार असून, आवश्‍यक इन्फ्रास्ट्रक्‍चर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली. नागपूरच्या एम्ससाठी २४८ पदांचा प्रस्ताव मंजूर झाला असून, लवकरच निवड प्रक्रिया सुरू होईल. सुरुवातीला मेडिकल परिसरात ‘एम्स’ कॅम्पस तयार होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.  

एम्ससंदर्भात सहा एप्रिल २०१७ रोजी दिल्लीतील एम्सचे विशेष कार्य अधिकारी डॉ. महेश  मिश्रा, आर्किटेक्‍ट वाजपेयी, प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेचे सुदीप श्रीवास्तव, वैद्यकीय सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे (मुंबई) मेडिकलकडून मिळणाऱ्या सुविधांची पाहणी  करण्यासाठी आले होते. विभागीय आयुक्त अनुपकुमार, डॉ. विरल कामदार यांच्यासोबत पथकाने एम्ससंदर्भात चर्चा केली होती. एम्समध्ये पहिल्या टप्प्यात ५० विद्यार्थी क्षमता प्रवेशासाठी ४० हजार स्वेअर फूट जागेचा वापर होणार आहे. यासाठी शैक्षणिक सत्रासाठी तीन लेक्‍चर हॉल, तीन प्रयोगशाळा, अधिकाऱ्यांना निवासासाठी अधिष्ठात्यांच्या बंगल्यासह पाच बंगले आणि अन्य कर्मचाऱ्यांसाठी आणखी तीन बंगले हस्तांतरित करण्यात येणार आहेत. एम्समधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्रासाठी मेडिकलच्या ई-लायब्ररी आणि सभागृह सोय केली जाईल. प्रात्यक्षिकांसाठी ॲनॉटॉमी विभागात प्रवेश दिला जाणार आहे. एकूणच मेडिकलमध्ये एम्स कॅम्पस तयार होणार असल्याचे सूतोवाच दिले गेले. 

Web Title: nagpur news aims